तिस्ता सेटलवाडला गुजरात एटीएसने केले अटक

तिस्ता सेटलवाडला गुजरात एटीएसने केले अटक

गुजरात दंगलीच्या मुद्द्यावर गुजरात एटीएस तिस्ता सेटलवाड यांच्या मुंबईतील घरी पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी गुजरात एटीएसच्या दोन संयुक्त पथकांनी तिस्ता सेटलवाड यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. सेटलवाडच्या एनजीओची चौकशी करण्यासाठी एटीएसची टीम तिला चौकशीसाठी अहमदाबादला घेऊन जाणार आहे.

यापूर्वी तीस्ता सेटलवाडा यांना मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळताना न्यायालयाने तीस्ता सेटलवाड यांच्याविरोधात चौकशीची गरज असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी शनिवार, २५ जून रोजी गुजरात एटीएस घरी पोहोचली आहे.

हे ही वाचा:

मुंबईमध्ये १४४ कलम लागू

शिंदेंचे समर्थन करण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर

मुंबईमध्ये १४४ कलम लागू

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा ‘त्या’ ट्विटमुळे अडचणीत

गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ५५ अधिकारी आणि राजकारण्यांना क्लीन चिट मिळाली आहे. सध्या गुजरात एटीएसने सेटलवाडला यांच्या घरातून त्यांना अटक केली आहे. दरम्यान, अमित शाह यांनी गुजरात दंगलीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जोडण्यासाठी मीडिया, एनजीओ आणि राजकीय लोकांना जबाबदार धरले आहे.

Exit mobile version