औरंगाबाद दौऱ्यावर निघालेले विमान दुरुस्तीला जवळपास दोन ते तीन तास वेळ लागणार असल्याची माहिती मिळाल्याने शिंदे-फडणवीस यांनी आपला दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना जवळपास अर्धा तास मुंबई विमानतळावर व्हीआयपी प्रतीक्षालयात थांबावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित औरंगाबाद दौरा होता.पण विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने शिंदे-फडणवीस यांचा औरंगाबाद दौरा रद्द झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळावरुन ठाण्याच्या दिशेने रवाना झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.
हे ही वाचा:
जितेंद्र आव्हाड आपली सर्वस्वी श्रद्धा औरंगजेबावर आहे!
सोमालियामध्ये दोन कारमध्ये स्फोट, ९ ठार
रितेशच्या चित्रपटाने प्रेक्षकांना लावले “वेड”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असलेला एकत्रित असलेला औरंगाबाद दौरा रद्द झाला असून विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा फटका त्यांना बसला आहे.आता हे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे कळते, तर मुख्यमंत्री दुपारी पुण्यासाठी निघणार आहेत.
महाराष्ट्र ऑलम्पिक स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी आज विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या दौऱ्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.