राज्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना राज्यातील शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. महाराष्ट्र राज्य अनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पद शिक्षक कृती समितीतर्फे ही आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. बुधवार, ३ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य अनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पद शिक्षक कृती समितीचे सदस्यांनी ठिय्या आंदोलन केले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थाना बाहेर हे आंदोलन केले गेले.
कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकाची २००३ ला नियुक्ती झाल्या दिवसापासून त्यांच्या वाढीव किंवा प्रस्तावित पदांना वेतनासहित मंजुरी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. गेली १० ते १५ वर्षे आम्ही वेतन न घेता काम करत आहोत. आमच्या मागण्यांसाठी वेळोवेळी राज्य शासनाकडे निवेदने सादर करुन न्याय मागितला. पण आमच्या पदरी निराशा आली असून मागण्या मान्य झाली नसल्याचे कृती समितीचे अध्यक्ष सतिन चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
ग्लास्गोमध्येही पंतप्रधान मोदींचे कलम ३७० हटवण्यासाठी कौतुक
फडके रोड राहणार सुना सुना, जमावबंदी लागू
स्वातंत्र्यवीरांवर होणाऱ्या क्षमापत्रांच्या आरोपाचे सप्रमाण खंडन करणारे अक्षय जोग यांचे नवे पुस्तक
हक्कानी नेटवर्कच्या ‘या’ नेत्याचा काबूलमध्ये खात्मा
त्यामुळे महाराष्ट्र राज्य अनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पद शिक्षक कृती समितीने या संबंधित आक्रमक पवित्रा घेतला असून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड़ यांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन छेडले गेले. अंदाजे ८० शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते. पण या आंदोलकांच्या मागण्या मान्य न करता उलट या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर राज्य सरकारने मागण्या मान्य न केल्यास आत्मदहनाचा इशाराही या शिक्षकांनी दिला आहे.