29 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरक्राईमनामामेहबूबा मुफ्तींच्या भावाला ईडीचे समन्स

मेहबूबा मुफ्तींच्या भावाला ईडीचे समन्स

Google News Follow

Related

सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडी ही महाराष्ट्रा सोबतच जम्मू काश्मीरमध्येही ॲक्शन मोडमध्ये असल्याचे दिसत आहे. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पिपल्स डेमोक्रॅटीक पार्टीच्या (पिडीपी) अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांचा भाऊ तस्सदक हुसेन मुफ्ती यांना ईडीने समन्स पाठवले आहे. तस्सदक हा मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारमध्ये पर्यटन मंत्री होते.

बुधवार, १७ नोव्हेंबर रोजी ईडीने हे समन्स पाठवले आहे. या समन्स नुसार गुरूवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ईडीच्या नवी दिल्ली येथील कार्यालयात जाऊन तस्सदक हुसेन मुफ्ती यांना आपला जबाब नोंदवायचा आहे. एका मनी लाॅन्डरिंग प्रकरणात हे समन्स पाठवण्यात आले आहे. तस्सदक यांच्या बँक खात्याशी निगडीत काही संशयास्पद व्यवहार ईडीच्या निदर्शनास आले आहेत. यामध्ये जम्मू काश्मीर येथील एका व्यावसायिकाकडून तस्सदक हुसेन यांच्या खात्यात काही रक्कम जमा करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

पवई येथील ह्युन्डाई कार सर्व्हिस सेंटर आगीच्या तडाख्यात

गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका; फडणवीसांचे पत्र

मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत

कोकणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कलगीतुरा!

दरम्यान या समन्सवरून मेहबूब मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. “जेव्हा जेव्हा मी चुकीच्या कारभाराच्या विरोधात आवाज उठवते तेव्हा माझ्या कुटुंबातील कोणा ना कोणासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचे समन्स तयारच असते. यावेळी माझ्या भावासाठी आहे.” अशी टीका मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे.

या आधी मेहबूबा यांच्या आई गुलशन नाझीर यांना ईडीने समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. या वर्षी जुलै महिन्यात मनी लॉन्डरिंगच्या एका प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात आली होती. तर स्वतः मेहबूबा यांची देखील एका मनी लॉन्डरिंगच्या प्रकरणात चौकशी झाली होती. त्यामुळे आता मेहबूबा यांचा भाऊ तस्सदक हे ईडीच्या चौकशीसाठी हजर राहणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा