मी पाकिस्तानात जन्मलेला भारतीय आहे, पंजाबी आहे पण जन्म इस्लाममध्ये झाला, अशा पद्धतीने स्वतःची ओळख करून देणारे प्रागतिक विचारांचे तारेक फतेह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. कॅनडात त्यांच्यावर उपचार सुरू होते तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७३ वर्षांचे होते.
त्यांना कर्करोग झाला होता. त्यांच्या पश्चात दोन कन्या. नताशा आणि नाझिया आहेत. नताशाने ट्विटरच्या माध्यमातून तारेक यांच्या निधनाचे वृत्त जाहीर केले.
तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंजाबचे सिंह, हिंदुस्थानचे सुपुत्र, कॅनडाचे प्रेमी, सत्यवचनी, न्यायासाठी लढा देणारे, दबलेल्या, वंचितांचा आवाज असे तारेक फतेह यांचे निधन झाले आहे. त्यांनी आपली जबाबदारी आता सोपविली आहे. त्यांची क्रांतिची ज्योत अशीच धगधगत राहील. तुम्ही यात सामील होऊ इच्छिता का? १९४९ ते २०२३.
Lion of Punjab.
Son of Hindustan.
Lover of Canada.
Speaker of truth.
Fighter for justice.
Voice of the down-trodden, underdogs, and the oppressed.@TarekFatah has passed the baton on… his revolution will continue with all who knew and loved him.Will you join us?
1949-2023 pic.twitter.com/j0wIi7cOBF
— Natasha Fatah (@NatashaFatah) April 24, 2023
तारेक फतेह यांचा जन्म २० नोव्हेंबर १९४९ रोजी कराची, पाकिस्तान येथे झाला. १९६० ते १९७०च्या दशकात डाव्या चळवळीतून त्यांचा उदय झाला. पाकिस्तानच्या लष्करी राजवटीने त्यांना दोनवेळा तुरुंगात डांबले. १९७७मध्ये जनरल झिया उल हक यांनी त्यांना राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली. पत्रकार म्हणून पाकिस्तानात काम करण्यास त्यांना मनाई करण्यात आली. मग ते १९८७मध्ये कॅनडात गेले आणि तेव्हापासून ते कॅनडातच राहिले.
हे ही वाचा:
गावातील लोकांमध्ये फूट पाडून राजकीय पक्षांनी आपली दुकाने चालवली
भूकंपाच्या धक्क्याने मेघालय हादरले
अश्लील रॅप गाण्याच्या चित्रीकरणाच्या विरोधात अभाविपची पुणे विद्यापीठात जोरदार निदर्शने
हिजाबपेक्षा शिक्षणाला महत्व देत कर्नाटकची तबस्सुम शेख पीयूसी परीक्षेत टॉपर
भारताशी आपली नाळ जुळली आहे, याचा त्यांना प्रचंड अभिमान होता. ते नेहमी म्हणत की, आपण राजपूत कुटुंबातून आलो होतो पण १८४०मध्ये आपल्याला जबरदस्तीने इस्लाम कबूल करण्यास सांगण्यात आले. इस्लाममधील कट्टरतावादावर ते जबरदस्त घणाघात करत. त्यामुळे जगभरातील मुस्लिमांकडून त्यांच्यावर प्रचंड टीका होत असे. पण असे असतानाही ते निर्भयपणे आपले विचार विविध माध्यमातून मांडत असत. ब्लॉग्स, पुस्तकांतून ते लिहीत होते.
हिंदुत्वाबद्दल ते नेहमीच आपुलकी व्यक्त करत. फतह का फतवा या कार्यक्रमातून झी न्यूजवर ते परखड आणि टोकदार मते व्यक्त करत. त्यातून मुस्लिम मुल्ला मौलवी खवळून उठत.