लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तापस रॉय यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.पक्षाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत तापस रॉय यांनी सोमवारी (४ मार्च) आमदारकीचा राजीनामा दिला.आता ते भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकासाठी तापस रॉय यांच्या राजीनाम्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
तापस रॉय यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मी माझ्या आमदार पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे.मी आता मुक्त पक्षी आहे.जानेवारीमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तापस रॉय यांच्या घरी छापा टाकला होता.यावर भाष्य करताना तापस रॉय म्हणाले की, ईडीने जेव्हा माझ्या घरी छापा टाकला तेव्हा पक्ष माझा पाठीशी नव्हता.त्यांनी आरोप केला की, पक्ष इतर नेत्यांच्या पाठीशी उभी आहे, मात्र माझासोबत कोणी नाही, अशी टीका त्यांनी केली होती.
हे ही वाचा:
विभागीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत आलोक, दुर्वाला सुवर्ण
भाजपाने चंदीगड उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली
बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएकडे!
नफे सिंग राठी हत्या प्रकरणी गोव्यातून दोन शूटर्सना अटक!
दरम्यान, टीएमसीचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री तापस रॉय हे बऱ्याच दिवसांपासून टीएमसीवर नाराज होते. त्यामुळेच त्यांच्या राजीनाम्याची अटकळ बांधली जात होती. तापस रॉय यांची नाराजी दूर करण्यासाठी टीएमसीनेते कुणाल घोष आणि ब्रात्या बसू यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.मात्र, या भेटीचा काहीच उपयोग झाला नाही आणि अखेर तापस रॉय यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकला आहे.