तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना नको आहे ‘हिंदीची गुलामगिरी’

एम. के. स्टॅलिन यांनी केले अजब विधान

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना नको आहे ‘हिंदीची गुलामगिरी’

‘हिंदी भाषेला कोणत्याही विरोधाशिवाय स्वीकार करणे आवश्यक आहे, भले या स्वीकारार्हतेचा वेग मंद असेल,’ अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडली होती. नवी दिल्लीत सरकारी भाषेसंबंधी झालेल्या संसद समितीच्या ३८व्या बैठकीत ते बोलत होते. या भूमिकेला तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी कडाडून विरोध केला आहे. ‘आम्ही हिंदीचे गुलाम कदापि होणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.  

 

अमित शहा यांनी या बैठकीत स्थानिक भाषांशी हिंदीशी स्पर्धा नाही. सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन दिल्यानेच देश सशक्त होईल, अशी भूमिका स्पष्ट केली होती. मात्र या विरोधात भूमिका मांडणारे ट्वीट स्टॅलिन यांनी केले आहे. ‘हिंदीच्या स्वीकारार्हतेबाबत अमित शहा यांनी मांडलेल्या भूमिकेला माझा कडाडून विरोध आहे. कोणत्याही प्रकारे हिंदी भाषा थोपवल्या जाण्याच्या प्रकाराचा तमिळनाडू धिक्कार करते. आमची भाषा आणि आमच्या वारशाचा आम्हाला अभिमान आहे.  

आम्ही हिंदीची गुलामगिरी कदापि सहन करणार नाही,’ असे ट्वीट त्यांनी केले आहे. कर्नाटक आणि बंगाल राज्यातही हिंदी भाषा थोपवल्या जात असल्याने तीव्र विरोध होत आहे, याकडेही स्टॅलिन यांनी शहा यांचे लक्ष वेधले. सन १९६५मध्ये झालेल्या हिंदीविरोधी आंदोलनाला पुन्हा भडकवणे हे मूर्खपणाचे ठरेल, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

‘जगदीश टायटलर यांनी जमावाला उकसवले; पुरेसे शीख मारले गेले नाहीत, असे म्हणाले’

इंडिगोच्या विमानात झाला एसीचा इश्यू; घाम पुसण्यासाठी वापरावे लागले टिश्यू!

अतिक अहमद टोळीचा सदस्य इरफान हसन पोलिसांच्या ताब्यात

नूंह हिंसाचार प्रकरणी बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येचा ‘आप’ नेत्यावर आरोप

तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी वैद्य अमित शहा यांनी  वैद्यकीय आणि इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम १० विविध भाषांमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले. लवकरच हे अभ्यासक्रम सर्व भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असतील. तो क्षण स्थानिक भाषा आणि सरकारी भाषांच्या उत्थानाची सुरुवात असेल. ‘पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत एकही भाषण इंग्रजीत दिलेले नाही. तसेच, अन्य केंद्रीय मंत्रीही भारतीय भाषांमध्ये भाषण देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे भिन्न भाषांना जोडण्याच्या मोहिमेला गती मिळते,’ असा आशावादही शहा यांनी व्यक्त केला.

Exit mobile version