भाजपा कार्यालयावर बॉम्ब हल्ला

भाजपा कार्यालयावर बॉम्ब हल्ला

देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला झाल्याची घटना पुढे आली आहे. तामिळनाडू येथे हा प्रकार घडला असून बुधवार, ९ फेब्रुवारीच्या रात्री हा हल्ला करण्यात आला.

रात्री अंदाज १-१.३० वाजण्याच्या सुमारास तामिळनाडू येथे भाजपा कार्यालयावर एक पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. हा बॉम्ब फेकणारा अज्ञात इसम हल्ला करून लगेच परागंदा झाला. तमिळनाडू येथील वैद्यरामन रस्त्यावर असलेल्या भाजपा कार्यालयाच्या दारावर हा बॉम्ब फेकण्यात आला.

या प्रकरणात भाजपाचे सरचिटणीस अरुण नागराजन यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आपला तपास सुरू केला असून यात विनोद नावाचा एक गुन्हेगार सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्याचे समजते. विनोद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर इतरही अनेक गुन्हे दाखल आहेत.

हे ही वाचा:

मुंबई विद्यापीठाच्या निर्णयावर मंगेशकर कुटुंबीय नाराज

बेरोजगारी, कर्जबाजारीमुळे तीन वर्षात २५ हजार आत्महत्या

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना समन्स

कर्णधार रोहित शर्माच्या डावपेचांसमोर वेस्ट इंडिज संघ क्लिन बोल्ड

पण भारतीय जनता पार्टीच्या तामिळनाडूमधील कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए मार्फत व्हावा अशी मागणी केली आहे. तर याच वेळी राज्यातील द्रमुक सरकारवर सडकून टीका केली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला जात असून एनआयए तपासातूनच सत्य आणि खरा कट उघड होईल असे तामिळनाडू भाजपाचे म्हणणे आहे. तामिळनाडू भाजपाचे अध्यक्ष अण्णामलाई यांनी पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे.

Exit mobile version