कन्याकुमारीमधील ध्यानधारणेचा अनुभव सांगत नरेंद्र मोदींनी सांगितला विकसित भारताचा रोड मॅप

पंतप्रधान मोदींनी देशवासियांना उद्देशून लिहिली पोस्ट

कन्याकुमारीमधील ध्यानधारणेचा अनुभव सांगत नरेंद्र मोदींनी सांगितला विकसित भारताचा रोड मॅप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर ४५ तास कन्याकुमारी येथे ध्यानधारणा केली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी ध्यानधारणा संपल्यानंतर नव्या संकल्पांची माहिती देणारी पोस्ट लिहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १ जून रोजी दुपारी ४.१५ ते ७ च्या दरम्यान कन्याकुमारीहून दिल्लीला विमानात परतताना हे विचार लिहिले होते, अशी माहिती आहे.

नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे की, माझ्या प्रिय देशवासीयांनो, लोकशाहीची जननी असलेल्या आपल्या देशात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव पार पडला. तीन दिवस आध्यात्मिक सानिध्यात घालवल्यानंतर दिल्लीला जाण्यासाठी मी विमानात बसतो आहे. मी एक खास उर्जा माझ्यासह घेऊन निघालो आहे. २०२४ च्या निवडणुकीत कितीतरी सुखद योगायोगही पाहिले आहेत. आपला देश अमृतकाळात आहे. या निवडणुकीचा प्रचार मी १८५७ च्या उठावाचं प्रेरणास्थळ असलेल्या मेरठ येथून सुरु केला. त्यानंतर भारताचा प्रवास करताना माझी शेवटची सभा पंजाबमधल्या होशियारपूर या ठिकाणी पार पडली. संत रविदास यांची ही भूमी. पंजाबमध्ये माझी अखेरची प्रचारसभा पार पडल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. यानंतर कन्याकुमारीत भारतमातेच्या चरणी बसण्याची संधी मिळाली. सुरुवातीच्या क्षणी माझ्या मनात निवडणुकीचा आवाज घुमत होता. रॅली आणि रोड शो मध्ये दिसणारे असंख्य चेहरे माझ्या डोळ्यासमोर येत होते. माता, भगिनी आणि मुलींच्या अपार प्रेमाची ती लाट, त्यांचे आशीर्वाद. त्यांच्या डोळ्यातला माझ्यासाठीचा विश्वास, ती आपुलकी. मी सगळं आत्मसात करत होतो. माझे डोळे ओले होत होते. मी शून्यात जात होतो, ध्यानात शिरत होतो,” असा अनुभव नरेंद्र मोदी यांनी कथित केला आहे.

“काही क्षणातच राजकीय वादविवाद, हल्ले आणि प्रतिआक्रमण, आरोप-प्रत्यारोपांचे आवाज आणि शब्द; ते सगळे आपोआप शून्यात गेले. माझ्या मनातील अलिप्ततेची भावना अधिक तीव्र झाली. माझे मन बाह्य जगापासून पूर्णपणे अलिप्त झाले. एवढी मोठी जबाबदारी पार पाडत असताना अशा प्रकारे ध्यान करणं कठीण असतं. मात्र, कन्याकुमारीच्या भूमीने आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने हे साध्य करु शकलो,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“कन्याकुमारीचे हे ठिकाण नेहमीच हृदयाच्या खूप जवळचे आहे. कन्याकुमारी ही संगमाची भूमी आहे. आपल्या देशातील पवित्र नद्या समुद्रांना मिळतात आणि इथे त्या समुद्रांचा संगम होतो. आणि इथे आणखी एक महान संगम दिसतो तो म्हणजे भारताचा वैचारिक संगम. येथे विवेकानंद रॉक मेमोरिअल सोबतच संत तिरुवल्लुवर, गांधी मंडपम आणि कामराजर मणि मंडपम यांचा मोठा पुतळा आहे. महान वीरांच्या विचारांच्या या प्रवाहांचा येथे राष्ट्रीय विचारांचा संगम होतो. यातून राष्ट्र उभारणीसाठी मोठी प्रेरणा मिळते. भारत हे राष्ट्र आणि देशाच्या एकतेबद्दल शंका घेणाऱ्यांना कन्याकुमारीची ही भूमी एकतेचा अमिट संदेश देते,” अशा भावना नरेंद्र मोदींनी मांडल्या आहेत.

“हजारो वर्षांपासून भारत एका अर्थपूर्ण उद्देशाने याच भावनेने पुढे जात आहे. भारत हजारो वर्षांपासून विचारांच्या संशोधनाचे केंद्र आहे. आपण जे कमावले आहे ते कधीही आपले वैयक्तिक भांडवल मानले गेले नाही आणि आर्थिक किंवा भौतिक बाबींवर कधीही तोलले गेले नाही. भारताच्या कल्याणाने जगाचे कल्याण होते, भारताच्या प्रगतीने जगाची प्रगती होते. आज भारताचे गव्हर्नन्स मॉडेल जगातील अनेक देशांसाठी एक उदाहरण बनले आहे. अवघ्या १० वर्षात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढणे अभूतपूर्व आहे. भारताची डिजिटल इंडिया मोहीम आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे की आपण तंत्रज्ञानाचा वापर गरीबांना सक्षम करण्यासाठी, पारदर्शकता आणण्यासाठी आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कसा करू शकतो. तंत्रज्ञानाच्या या लोकशाहीकरणाकडे संपूर्ण जग संशोधनाच्या दृष्टिकोनातून पाहत आहे आणि मोठ्या जागतिक संस्था अनेक देशांना आमच्या मॉडेलपासून शिकण्याचा सल्ला देत आहेत,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“आज २१ व्या शतकातील जग भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. आणि जागतिक परिस्थितीत पुढे जाण्यासाठी आपल्याला अनेक बदल करावे लागतील. सुधारणांबाबतची आपली पारंपरिक विचारसरणीही बदलावी लागेल. भारत सुधारणांना केवळ आर्थिक बदलांपुरते मर्यादित करू शकत नाही. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला सुधारणेकडे वाटचाल करायची आहे. आपल्या सुधारणा देखील २०४७ पर्यंत विकसित भारताच्या संकल्पानुसार असायला हव्यात. भारताला विकसित भारत बनवायचे असेल तर आपल्याला उत्कृष्टतेचे मूळ मूल्य बनवावे लागेल. वेग, स्केल, व्याप्ती आणि मानके या चारही दिशांमध्ये आपल्याला वेगाने काम करावे लागेल. आपल्याला उत्पादनासोबत गुणवत्तेवर भर द्यावा लागेल, शून्य दोष-शून्य परिणामाचा मंत्र आत्मसात करावा लागेल,” असा सल्ला नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना दिला आहे.

हे ही वाचा:

भारतात मोदी सरकार येणार समजताच पाकिस्तान चिंतेत; पाकच्या माजी परराष्ट्र सचिवांनी दिला इशारा

मोदी ३.O चे परिणाम शेअर बाजारात; सेन्सेक्स २६२१ वर उघडला

राहुल गांधी म्हणतात एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे

अजबच! उष्म्यामुळे चोर एसी लावून झोपला, पकडला गेला!

स्वामी विवेकानंदांनी १८९७ मध्ये सांगितले होते की आपल्याला पुढील ५० वर्षे फक्त राष्ट्रासाठी समर्पित करावी लागतील. त्यांच्या आवाहनानंतर बरोबर ५० वर्षांनी १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. आज आपल्याला अशी सुवर्णसंधी मिळाली आहे. पुढील २५ वर्षे देशासाठी समर्पित करूया. आमचे हे प्रयत्न नवीन भारताचा भक्कम पाया म्हणून येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि येणाऱ्या शतकांसाठी अमर राहतील. देशाची उर्जा पाहता मी असे म्हणू शकतो की ध्येय फार दूर नाही. चला, जलद गतीने वाटचाल करूया… एकत्र वाटचाल करूया आणि भारताचा विकास करूया,” असं आवाहन नरेंद्र मोदींनी समस्त भारतीय जनतेला केले आहे.

Exit mobile version