वाट लावणाऱ्या तालिबानला सत्तेसाठी पाहावी लागणार वाट!

वाट लावणाऱ्या तालिबानला सत्तेसाठी पाहावी लागणार वाट!

अफगाणिस्तानावर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर सत्ता स्थापना कधी याकरता जगाचे लक्ष वेधले होते. सत्तास्थापना करण्यासाठी इराणच्या प्रारुपानुसार सत्ता स्थापन करण्यात येईल असे सांगण्यात येत होते.

परंतु सध्याच्या घडीला मात्र इतक्यात सत्ता स्थापना होणार नसल्याचे तालिबानकडून आता सांगण्यात आलेले आहे. अफगाणिस्तानात नवीन सरकार स्थापन करण्याची घोषणा नुकतीच करण्यातही आली होती. याकरता शुक्रवारी अंमलबजावणी होणे गरजेचे होते. परंतु आता सत्ता स्थापन थोडे लांबणार आहे अशी माहिती, तालिबानचे प्रवक्ते झबीउल्लाह मुजाहिद यांनी दिलेली आहे. नवीन सरकारच्या स्थापनेची घोषणा आता येत्या काही दिवसात केली जाईल असेही ते म्हणाले.

पीटीआयने दिलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार असे म्हटले आहे की, तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे अध्यक्ष दोहा कतार मुल्ला अब्दुल गनी बरदार तालिबान सरकारचे प्रमुख असण्याची शक्यता आहे. तालिबानच्या माहिती आणि संस्कृती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी मुफ्ती इनामउल्ला सामंगानी म्हणाले, “नवीन सरकारवर सल्लामसलत जवळजवळ अंतिम झाली आहे आणि मंत्रिमंडळाबद्दल आवश्यक चर्चा देखील झाली आहे.”

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर दोन आठवड्यांनंतर, कट्टर इस्लामवादी इराणी नेतृत्वाच्या धर्तीवर काबूलमध्ये नवीन सरकार स्थापनेची घोषणा करण्यास सज्ज आहेत, या गटाचे सर्वोच्च धार्मिक नेते मुल्ला हेबतुल्ला अखुंदजादा अफगाणिस्तानचे सर्वोच्च अधिकारी आहेत, एक वरिष्ठ गटाच्या सदस्याने सांगितले.
सध्याच्या घडीला सरकारसंदर्भातील अनेक चर्चा अफगाणिस्तानात होत आहेत. परंतु तालिबानकडून मात्र या चर्चांची काहीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

हे ही वाचा:

‘जनआर्शीवाद यात्रेने विरोधकांचे धाबे दणाणले’

किती मासे गळाला लागले त्याची होणार आता अशी मोजदाद

कुटुंबाला मिळाली अपघाताची नुकसान भरपाई तब्बल पाच वर्षांनी!

भागीदाराच्याच खुनाचा कट रचल्याप्रकरणी अटक!

विविध गटांशी चर्चा करण्यासाठी आता खलिल हक्कानीच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. जगाची मान्यता मिळेल असे सरकार स्थापन्याचा प्रयत्न असल्याचे आता ऐकिवात येत आहे. त्यामुळेच सध्याच्या घडीला या सरकार स्थापनेच्या प्रक्रियेस विलंब होत आहे. सध्याच्या घडीला अमेरिका, ब्रिटन आणि भारतही तालिबान सरकारला मान्यता देण्याची कुठलीही घाई करताना दिसत नाही.

Exit mobile version