अफगाणिस्तानात महिला टीव्ही अँकरचे ‘चेहरे’ गायब

अफगाणिस्तानात महिला टीव्ही अँकरचे ‘चेहरे’ गायब

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने महिलांवर अनेक निर्बंध लादत आहे. यामध्येच आता अजून एका निर्बंधाची भर पडली आहे. तालिबानने गुरुवार, १९ मे रोजी निर्देश दिले की, वृत्तवाहिन्यांवर काम करणाऱ्या सर्व महिला निवेदिकांनी कार्यक्रम सादर करताना त्यांचे चेहरे झाकले पाहिजेत. या निर्णयावर अफगाणिस्तानमध्ये निषेध केला होता. मात्र, रविवारपासून महिला निवेदकांनी या निर्देशाचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी त्यांना फक्त डोक्यावर स्कार्फ घालणे बंधनकारक होते.

तालिबान प्रशासनाच्या वतीने महिला टीव्ही निवेदिकांना शनिवारपासून या आदेशाचे पालन करण्यास सांगण्यात आले. मात्र, शनिवारी तालिबानच्या आदेशाला आव्हान देत प्रमुख वाहिन्यांच्या महिला निवेदिकांनी चेहरा न झाकता वृत्त प्रसारित केले. परंतु, रविवारी निवेदिका आणि महिला पत्रकार टीव्हीवर पूर्ण हिजाब आणि चेहरा झाकणारे बुरखा घालून दिसल्या. यावेळी महिला निवेदिकांचे फक्त डोळे दिसत होते.

मागील वर्षी तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. त्यावेळी तालिबानने दावा केला होता की, यावेळी तालिबान बदलले आहे. मात्र, हा दावा तालिबान दिवसेंदिवस चुकीचा ठरवत आहे. सत्तेत आल्यापासून तालिबानने महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत. महिलांना सरकारी नोकऱ्या, माध्यमिक शिक्षण आणि त्यांच्या शहरात किंवा अफगाणिस्तानच्या बाहेर एकट्याने प्रवास करण्यास बंदी आहे.

हे ही वाचा:

इंग्लंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे सोनिया गांधीनी पसरला पदर

जपानी मुलाचं हिंदी ऐकून पंतप्रधान मोदी म्हणाले…

मशिदींतून काढलेले भोंगे शाळा, रुग्णालयांना दान

‘१.५, २ रुपये इंधन दर कमी करणे ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा’

याआधी १९९६ ते २००१ या काळात तालिबान सत्तेत असताना महिलांवर अनेक निर्बंध लादले होते. त्यांना बुरखा घालण्यास भाग पाडले आणि त्यांना शिक्षण, सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवले. यावेळीही अफगाणिस्तानातील महिलांवर एकामागून एक निर्बंध लादले जात आहेत.

Exit mobile version