‘पाकिस्तानी कसाबला सहानुभूती आणि हिंदुस्तानी उज्वल निकमांविषयी इतका द्वेष’

भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांची विजय वडेट्टीवारांवर टीका

‘पाकिस्तानी कसाबला सहानुभूती आणि हिंदुस्तानी उज्वल निकमांविषयी इतका द्वेष’

२६/११ च्या मुंबई हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरेंना लागलेली गोळी ही दहशतवादी अजमल कसाबच्या बंदुकीची नसून एका पोलीस अधिकाऱ्याची होती आणि तो अधिकारी आरएसएसशी संबंधित होता, असा आरोप करणाऱ्या विजय वडेट्टीवारांवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेनंतर भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील टीका केली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटकरत म्हटले की, व्वा रे व्वा…विजय वडेट्टीवार, पाकिस्तानी कसाबला सहानुभूती आणि हिंदुस्तानी उज्वल निकमांविषयी इतका द्वेष…पुन्हा-पुन्हा समोर येतोय काँग्रेसचा हिंदूद्वेषी हिरवा वेश…कांग्रेसच्या थापाड्यानं थापा मारण्यास सुरूवात केली आहे. कांग्रेसचा पराजय दिसत असल्यामुळे शहीदांचा अपमान करण्याची दुर्बुद्धी आली आहे. खरंतर विजय वडेट्टीवार पाकिस्तानचीच भाषा बोलताहेत. अशा वक्तव्यामुळे पाकिस्तानची हुजरेगिरी वडेट्टीवार करताहेत, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा:

“यंदाच्या निवडणुकीत उबाठाच्या मशालीची चिलीम होणार”

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू!

गुजरातवरील विजयामुळे बेंगळुरूच्या ‘प्लेऑफ’मध्ये जाण्याच्या आशा जिवंत!

‘रोहित वेमुलाच्या मृत्यूचे राजकारण केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी’

त्या पुढे म्हणाल्या, अहो, विजयराव…२६/११ चा हल्ला झाला तेंव्हा तुमचं सरकार होतं. १६६ लोकांचा मृत्यू झाला तेंव्हा तुमचं सरकार होतं.३०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले तेंव्हा तुमचं सरकार होतं.हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळस्कर, तुकाराम ओंबाळे जी शहीद झाले तेंव्हा तुमचं सरकार होतं.हल्ल्याचा तपास झाला तेंव्हा तुमचं सरकार होतं.कोर्टात सुनावण्या झाल्या तेंव्हा तुमचं सरकार होतं.हल्ल्यानंतर राम प्रधान समिती स्थापन केली तेंव्हा तुमचं सरकार होतं. कोर्टानं निकाल दिला तेंव्हा पण तुमचं सरकार होतं.तेंव्हा बोलायला तुमचं तोंड कोणी शिवलं होतं का ?, अशा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आत्ता अशा प्रकारची बडबड करून तुम्ही शहीदांचा, त्यांच्या कुटुंबियांचा आणि देशाचा अपमान केला आहे. राहुल गांधी चीनची चाकरी करताहेत आणि त्यांचे विजय वडेट्टीवार सारखे त्यांचे चेलेचपाटे पाकिस्तानची चाकरी करताहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी शहीदांच्या कुटुंबियांची आणि संपूर्ण देशाची माफी मागायला पाहीजे. नाहीतर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला जोड्याने झोडल्याशिवाय सोडणार नाही, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

 

Exit mobile version