उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का

गेल्या काही दिवसांपासून ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं आहे

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणूकीपर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवलं आहे. तसेच पक्षाचं नावही दोन्ही गटाला वापरता येणार नसल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. मात्र, दोन्ही गटाला ठाकरे गट आणि शिंदे गट अशी नावे वापरता येऊ शकतात. याशिवाय अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटाला वेगळे चिन्ह देण्यात येईल, असे निवडणूक आयोगायाने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्याने उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. कारण आगामी होणाऱ्या पोटनिवडणुकीत चिन्ह गोठवल्याने उद्धव ठाकरेंना नवीन चिन्ह मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही जमेची बाब ठरू शकते. कारण या पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा उमेदवार आहे. याचा अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

हे ही वाचा:

या प्रकरणी सीबीआयकडून लालू यादवांसह १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त

दरम्यान, अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार, ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. त्या पत्रात एकनाथ शिंदे यांनी चिन्हावर दावा सांगितला होता. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता निवडणूक चिन्हाचा हा वाद लवकर निकाली काढणे आवश्यक आहे. कारण उद्धव ठाकरे गट आपल्या उमेदवारांसाठी धनुष्यबाण चिन्हावर दावा करू शकते, असे एकनाथ शिंदे यांनी पत्रात नमूद केले होते. यानुसार निवडणूक आयोगाने सर्व बाबींचा विचार करून पोटनिवडणुकीपर्यंत शिवसेनेचे चिन्ह गोठवले आहे.

Exit mobile version