युरोप मधील प्रसिद्ध अशा स्वीडन देशाला आजवरच्या त्यांच्या इतिहासातील पहिल्या महिला पंतप्रधान मिळाल्या होत्या. पण पंतप्रधान पदी नियुक्ती झाल्यावर अवघ्या काही तासातच त्यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली. स्वीडनचे राजकारण नाट्यमयरित्या फिरले असल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली. त्यामुळे आता स्वीडनमधील हे राजकारण नेमके काय नवे वळण घेणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.
स्वीडनमधील सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मॅग्डालेना अँडरसन त्यांना बुधवारी स्वीडनचे पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले. मात्र त्यांच्या मित्र पक्षांच्या राजकारणाला त्या बळी पडल्या. त्यामुळे अवघ्या काही तासातच त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ ओढावली. आपल्याला राजीनामा द्यायचा असल्याचे आपण स्पीकरला सांगितले आहे असे अँडरसन यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. तर पुन्हा सरकार स्थापन करून पंतप्रधान होण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
वानखेडेंविरोधात ट्विट करणार नाही! नवाब मलिक मुंबई उच्च न्यायालयासमोर नमले
पडळकर, खोत एसटी आंदोलनातून बाहेर
स्वीडनच्या राजकारणात सोशल डेमोक्रॅटिक पक्षाने ग्रीन्स पार्टी या राजकीय पक्षा सोबत युती केली होती. जग ग्रीन्स पार्टीने सांगितले की एका राईट विंग पक्षासोबत त्यांनी प्रथमच तयार केलेला अर्थसंकल्प ते स्वीकारू शकत नाहीत. त्यामुळे या राजकारणात अँडरसन यांचा बळी गेला असून त्यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की आली. स्वीडिश कायद्यानुसार अँडरसन यांना विरोधात मतदान न करणाऱ्या बहुसंख्य खासदार यांची आवश्यकता होती.
मॅग्डालेना अँडरसन या स्वीडनमधील सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या असून त्यांनी स्वीडनचे माजी पंतप्रधान गोरान पर्सन यांच्या राजकीय सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. तिथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. गेली सात वर्ष स्वीडनच्या अर्थमंत्री म्हणून त्या काम बघत आहेत.