दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी पंजाब सरकार आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर तीव्र हल्लाबोल केला आहे. पंजाबमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेल्या कारवाईवर भाष्य करताना, मालीवाल म्हणाल्या की, ही कारवाई हायवे मोकळा करण्यासाठी नव्हती, तर केजरीवाल यांच्यासाठी राज्यसभेचा मार्ग मोकळा करण्यासाठी होती.
स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (Twitter) वर लिहिले, “केजरीवाल यांना वाटते की असं केल्याने लुधियानाचा व्यापारी खूश होईल, त्यामुळे निवडणूक जिंकता येईल आणि अरोरा यांची राज्यसभा सीट रिकामी होईल.”
स्वाती मालीवाल यांनी पंजाब सरकारवर प्रश्न उपस्थित केला, “जेव्हा शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करत होते, तेव्हा पंजाबमध्येही निवडणुका जवळ येत होत्या. त्यावेळी केजरीवाल यांनी स्वतःला ‘सेवादार’ म्हणून सादर केले.”
“आता पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत, तेव्हा त्यांना चर्चेऐवजी दडपशाहीने संपवण्याचा प्रयत्न का केला जात आहे?” असे दुहेरी धोरण का?”
स्वाती मालीवाल यांनी केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले, “चर्चेच्या ऐवजी दडपशाही मार्ग अवलंबणे म्हणजे केजरीवाल यांचा अहंकार आणि सूडबुद्धीचा आणखी एक पुरावा आहे.”
हे ही वाचा:
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले; दोन वेगळ्या चकमकींमध्ये २२ नक्षलवाद्यांचा खात्मा
चॅम्पियन्स रोहित सेना मालामाल!
“दिशाच्या वडिलांनी याचिका दाखल करून योग्य केले”
कोस्टल रोड येथे ३० वर्षीय तरुणाची समुद्रात उडी घेऊन आत्महत्या
पंजाब काँग्रेस प्रमुख अमरिंदर सिंह राजा यांनीही राज्य सरकारला इशारा दिला आणि म्हटले, “पंजाब सरकार शेतकऱ्यांशी अन्याय करत आहे. आम्ही हे सरकार उलथवून टाकू. त्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर निशाणा साधत म्हटले, “भगवंत मान जसे वागत आहेत, तशीच ब्रिटिश राजवट करत होती.
काँग्रेस खासदार सुखजिंदर सिंह रंधावा यांनीही पंजाब सरकारवर निशाणा साधला आणि म्हटले, पंजाब सरकार आणि केंद्र सरकार हे शेतकऱ्यांविरोधात एकत्र काम करत आहेत. तृणमूल काँग्रेसने शेतकऱ्यांवरील कारवाईचा निषेध केला. तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी म्हटले, “मी शेतकऱ्यांवरील कारवाईचा तीव्र निषेध करतो.”
पंजाब विधानसभेचे अध्यक्ष कुलतार संधवा यांनी शेतकऱ्यांना पंजाबमधील रस्ते मोकळे करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, मार्ग बंद राहिल्याने व्यापार आणि उद्योगावर मोठा परिणाम होत आहे. नशाविरोधी मोहिमेबाबत त्यांनी सांगितले की, ‘नशेविरोधी लढ्यात संपूर्ण पंजाब एकत्र आहे.’