उपरती झाली; स्वा. सावरकर यांचे नाव संमेलन गीतात समाविष्ट

उपरती झाली; स्वा. सावरकर यांचे नाव संमेलन गीतात समाविष्ट

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर अन्याय करणाऱ्या साहित्य संमेलन आयोजकांना अखेर उपरती झाली आहे. नाशिक मध्ये होत साहित्य संमेलनासाठी लिहिलेल्या गीतात नाशिकसह सावरकर यांच्या नावाचा साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये समावेश करण्याची उपरती अखेर आयोजकांना झाली आहे. त्यासाठी संमेलन गीत पुन्हा नव्याने तयार करण्यात आले आहे.

या त्या ओळी आहेत-

रामकथेचा पट उलगडला इथल्या मातीवरती
ज्ञानाने सोपान गाठता मुक्त होय निवृत्ती
गडकिल्ले हे शिवरायांना सदैव वंदन करती
स्वातंत्र्य सूर्य सावरकर उजळे अनंत क्षितीजावरती

नाशिकमध्ये होणारे ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ना त्या कारणाने सतत वादात आहे. साहित्य संमेलन गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नावच नसल्याचे आढळले. गीतकार मिलिंद गांधी यांनी हे गीत रचले आहे. नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा या गीतातून घेतला आहे. संजय गीते यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. पण या गीतामध्ये स्वातंत्र्यवीर, नाशिकचे भूमिपुत्र, साहित्यिक आणि मुंबई येथे १९३८ मध्ये झालेल्या २३व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वि. दा. सावरकर यांच्या नावाचा उल्लेख नव्हता.

सावरकर यांचा जन्म नाशिकचा. २८ मे १८८३ रोजी भगूर, नाशिक येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी जवळपास पन्नासच्यावर पुस्तके लिहिली. त्यात १८५७चे स्वातंत्र्यसमर, संगीत उत्तरक्रिया, काळे पाणी, गांधी आणि गोंधळ, जोसेफ मॅझिनी, महाकाव्य कमला, महाकाव्य गोमांतक, माझी जन्मठेप, मोपल्यांचे बंड, शत्रूच्या शिबिरात, संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष, सावरकरांच्या कविता, क्ष – किरणें अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे. मात्र, असे असूनही सावरकरांच्या नावाचा उल्लेख साहित्य संमेलन गीतात उल्लेख नव्हता.

हे ही वाचा:

नवाब मलिक यांनी केले ईडीचे स्वागत

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये कोण ठरणार सरस?

ऑफिसच्या वेळेनंतर बॉसने फोन करणे आता बेकायदेशीर

राजकीय वातावरण तापलेले असतानाच नड्डा मुंबईत

विशेष म्हणजे संमेलन गीतामध्ये साम्यवादापासून ते थेट ‘भुजाभुजातील समता करते स्वागत शब्दप्रभूंचे’ असा उल्लेख होता. नाशिकमधील इतर सर्वच साहित्यिकांचा नावासह उल्लेख होता. मात्र, सावरकरांच्या नावाचा उल्लेख जाणूनबुजून टाळल्याची चर्चा होती. त्यावरून सावकरप्रेमी संतप्त झाले होते. अखेर वाढता संताप पाहता संमेलन गीतामध्ये सावरकरांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे संमेलन गीताच्या एका ओळीत बदल करण्यात आला आहे.

Exit mobile version