पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून फाळणीच्या वेळी होते तसेच वातावरण आज बंगालमध्ये आहे अशी भूमिका भारतीय जनता पार्टीचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी मांडली. बुधवार, ५ मे रोजी सुवेंदू यांनी माध्यमांशी बातचीत केली.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर सुरु झालेल्या हिंसाचाराने देशाला हादरवून सोडले आहे. २ मे रोजी पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाले. त्या दिवसापासूनच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हिंसेला सुरुवात झाली. त्यानंतर पुढल्या दोन दिवसात या हिंसाचाराने आणखीनच भीषण रूप धारण केले. दुकाने लुटण्यात आली, भाजपा पक्षाची कार्यालये जाळण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. असंख्य भाजपा कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले झाले. सामूहिक बलात्काराच्या घटनाही समोर आल्या आहेत. आत्तापर्यंत १२ जणांची या हिंसाचारात हत्त्या झाल्याच्या बातम्या येत आहेत पण हा आकडा आणखीन जास्त असून शकतो असे म्हटले जात आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसही अपयशी होताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारने मराठा आरक्षण विषयाचे फक्त राजकारण केले
मराठा आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले
ठाकरे सरकारमधील समन्वयाच्या अभावामुळेच हा दुर्दैवी निर्णय
…तर देशभरातील भाजपा कार्यकर्ते प. बंगालमध्ये धडकतील
यावर भारतीय जनता पार्टीचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुवेंदू यांनी नंदिग्राममधून ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. निकालाच्या दिवशी सुवेंदू यांच्या गाडीवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर अनेक हिंसाचाराच्या घटना घडल्या या साऱ्या परिस्थितीवरच अधिकारी यांनी भाष्य केले आहे. बंगालमधली परिस्थिती खूप गंभीर आहे. मी अनेक काळ राजकारणात आहे. २००१ मध्यही असेच वातावरण निर्माण करण्यात आले होते. जेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची गच्छंतीची वेळ आली होती. त्यावेळी ममता यांनी ६० जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काही भागात हिंसा झाली होती. आज राज्यभर होत आहे. नड्डाजी म्हणाले त्याप्रमाणे फाळणीच्या वेळी होती तशी परिस्थिती आज राज्यात आहे.