28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरराजकारणकाँग्रेसमधील बंडखोरांना सहा वर्षांसाठी टाटा, बाय-बाय

काँग्रेसमधील बंडखोरांना सहा वर्षांसाठी टाटा, बाय-बाय

काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या जागावाटपानंतर अनेक पक्षांमध्ये बंडखोरीचे चित्र होते. बंडखोरांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून होते. काही दिवसांपूर्वीचं भाजपाने बंडखोरी करणाऱ्या अनेक नेत्यांची हकालपट्टी केली होती. तर, आता यापाठोपाठ काँग्रेसमध्येही बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. जागावाटपानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी बंडखोरी केली होती. आता बंडखोरांविरोधात काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारला आहे.

कांग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केल्यानंतर त्या नेत्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी याबाबत माहिती दिली आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक, काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ञवल्क्य जिचकार, पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

सांगली विधानसभेसाठी काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर वसंतदादा गटाने जयश्री पाटील यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. शिवाय खासदार विशाल पाटील यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता जयश्री पाटील यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. जयश्री पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

‘उद्धव ठाकरे घरात नाहीतर लोकांच्या दारात शोभून दिसतात’

‘जम्मू-काश्मीर विधानसभेत हाणामारी, कलम ३७० चे बॅनर भाजपाने फाडले’

लोकसभेच्या पराभवानंतर भाजपाने केले मायक्रो मॅनेजमेन्ट!

उबाठाचे नेते भास्कर जाधव काँग्रेसवर वैतागले

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच गॅरंटी आम्ही जाहीर केल्या आहेत. प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे हे महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. ज्या कांग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. याशिवाय महाविकास आघाडीचा जाहीरनामा १० नोव्हेंबरला जाहीर होणार असल्याचे ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा