मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे

महाराष्ट्र सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणामुळे चर्चेत आलेले निलंबित पोलिस अधिकारी परमबिर सिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. डिसेंबर २०२१ मध्ये परमबीर सिंह यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते.

महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सत्तेवर असताना परमबिर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यांच्या पात्रामुळेच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे अडचणीत सापडले होते. शिवाय त्यांच्यावर कारवाई देखील झाली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारने परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेतले आहे.

हे ही वाचा:

‘द केरळ स्टोरी’ची शालिनी उन्नीकृष्णन सापडली!

‘कोणाचेच घर वाचणार नाही’- इम्रानच्या सुटकेनंतर पाकिस्तानच्या मंत्री बोलल्या

इम्रान खान यांना दिलासा, पण भविष्य अंध:कारमय

“सुषमा अंधारेंनी शरद पवारांऐवजी ठाकरेंसमोर रडावं”

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप परमबीर सिंह यांनी करून मोठी खळबळ उडवली होती. त्यानंतर परमबीर यांच्याविरोधातही अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांना त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. ठाणे आणि नवी मुंबईतील पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात खंडणी वसूल करणे आणि अ‍ॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल आहेत.

Exit mobile version