लोकसभा अध्यक्षांकडून ४९ खासदारांचे निलंबन

सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचाही समावेश

लोकसभा अध्यक्षांकडून ४९ खासदारांचे निलंबन

लोकसभेच्या खासदारांच्या निलंबनाचे सत्र अद्याप सुरू असून सोमवारी अनेक खासदारांचे निलंबन करण्यात आले होते. यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्यात आले होते. अशातच मंगळवार, १९ डिसेंबर रोजी आणखी ४९ खासदारांचे निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आले आहे.

मंगळवारी निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर, लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन घेरलं होतं. संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. लोकसभेत अध्यक्षांचा अपमान करणाऱ्या अनेक खासदारांना पुन्हा निलंबित करण्यात आलं आहे. मंगळवारी ४१ खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय आठ राज्यसभा खासदारांनाही निलंबित करण्यात आलं आहे. यासोबतच आतापर्यंत दोन्ही सभागृहातील १४१ खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

चीनमधील भूकंपात १११ ठार; २३० जखमी!

तामिळनाडूत पुरामुळे हाहाःकार; रेल्वे स्थानकावर ८०० प्रवासी अडकले

लोकसभेत टेलिकॉम विधेयक सादर

ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक घेणार त्यांची जागा

लोकसभेतून निलंबित झाल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “लोकशाहीच्या मार्गाने आम्ही निवडून आलोय. पण दडपशाही सुरु झाली आहे. आतापर्यंत १०० हून अधिक खासदार निलंबीत झाले आहेत. संसदेत हल्ला झाला. त्यासंदर्भात आम्ही चर्चेची मागणी केली. पण प्रश्न विचारणारे बाहेर आहेत. सत्ताधाऱ्यांना विरोधक नको आहेत, त्यामुळे निलबंनाची कारवाई करण्यात आली,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Exit mobile version