पावसाळी अधिवेशनात विरोधकांचा महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि तपास यंत्रणा यावरून गदारोळ सुरूच असून राज्यसभेमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात तृणमूल काँग्रेसच्या सात खासदारांसह १९ खासदारांना एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.
जीएसटी आणि बेरोजगारी यासारख्या अनेक मुद्द्यांवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. यावेळी त्यांनी घोषणा दिल्या. राज्यसभा अध्यक्षांनी वारंवार सूचना केल्यानंतरही विरोधकांनी न ऐकल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संसदेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी विरोधकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
सोनिया गांधींची पुन्हा ईडी चौकशी; आंदोलन करणारे राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात
नरेंद्र मोदी तुमचे वडील नव्हते, मग त्यांचे फोटो वापरून का निवडणूक लढविली?
…म्हणून भालाफेकपटू नीरज चोप्राने राष्ट्रकुल स्पर्धेतून घेतली माघार
अदानी-रिलायन्सपैकी कोण जिंकणार 5G स्पेक्ट्रमची बोली
खासदार डॉ. शंतनू सेन, खासदार सुष्मिता देव आणि खासदार डोला सेन यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या सहा खासदारांना आणि इतर पाच खासदारांना आठवड्याभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. आजच्या आंदोलनात जीएसटी आणि महागाई या मुद्द्यांवर आवाज उठवण्यात आला होता. दरम्यान, गुजरातमधील विषारी दारु प्यायल्यामुळे काही जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणावर राज्यसभेत चर्चा करण्याची मागणी टीएमसीकडून करण्यात आली होती. पण याबाबत चर्चा करण्यास परवानगी न दिल्यामुळे विरोधकांनी आक्रमकपणे आंदोलन केले.