परमबीर सिंह यांचे तात्काळ निलंबन करून त्यांना अटक करा – अतुल भातखळकर

परमबीर सिंह यांचे तात्काळ निलंबन करून त्यांना अटक करा – अतुल भातखळकर

मुंबई पोलीस आयुक्त यांची हकालपट्टी केल्यानंतर विरोधक ठाकरे सरकारवर तुटून पडले आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. परमबीर सिंह यांची फक्त बदली करून भागणार नाही तर त्यांचे तात्काळ निलंबन करा अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर आता मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पण परमबीर सिंह यांची केवळ बदली पुरेशी नसून त्यांच्या निलंबनाची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. परमबीर सिंह यांच्या निलंबनाची शिफारस करणे हाच मनसुख हिरेन यांना खऱ्या अर्थाने न्याय असेल. मुंबई पोलीस आयुक्तालयातूनच खंडणीच्या आणि दहशतवादाच्या कारवाया होतात या गुन्ह्याला माफी असू शंका नाही. असे भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. सचिन वाझेला वाचवण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री जसे उघड्यावर पडले तेच परमबीर सिंह यांच्या बाबतीत होईल असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

अखेर परमबीर सिंह यांची हकालपट्टी

कुबेरगिरी, अर्थात निसटलेल्या लंगोटीची नैतिकता

शरद पवारांचे काँग्रेसला थेट आव्हान, तरीही आघाडीत सर्वकाही आलबेल?

निलंबन, एफआयआर आणि अटक हीच भाजपाची मागणी
परमबीर सिंह यांची फक्त बदली पुरेशी नाही. त्यांच्या बदलीची शिफारस केंद्राकडे करावी आणि त्यांचे निलंबन करून एफआयआर दाखल करण्यात यावा असे आमदार अतुल भातखळकरांनी म्हटले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई मधील ‘अँटिलीया’ या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्यानंतर या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. वाझे यांच्या अटकेनंतर त्यांचे निलंबनही केले गेले. याच प्रकरणामुळे आता परमबीर सिंह यांच्यावरही बदलीची नामुष्की ओढवली आहे. अंबानी यांच्या केसमध्ये परमबीर सिंह यांच्या नेतृत्वातील मुंबई पोलिसांच्या तपासावर पहिल्यापासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. अशातच मुंबई पोलिसांच्या सीआययु युनिटमधील अधिकारी सचिन वाझेच या प्रकरणातील मुख्य आरोपी झाले. अंबानी प्रकरणात दिसून आलेली पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी ही मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात आढळून आली. इतकच नाही तर ही गाडी पोलीस दलाच्या वापरातील होती असे देखील समोर आले. त्यामुळे या प्रकरणात पोलीस दलातील अनागोंदी कारभार समोर आल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांवर बदलीची कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version