गोंधळी खासदारांना २ वर्षांसाठी निलंबित करा

गोंधळी खासदारांना २ वर्षांसाठी निलंबित करा

The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.

“केंद्र सरकारला कोणावरही पाळत ठेवण्याची गरज नाही, फोन टॅपिंगची गरज नाही. पेगसिसबाबतचा केंद्र सरकारवरील आरोप बिनबुडाचा आहे. केंद्र सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र, विरोधक चर्चा न करता संसदेत गोंधळ घालत आहेत. त्यामुळे सलग ३ दिवस गोंधळ घातल्यानंतर चौथ्या दिवशीही जो खासदार आपली जागा सोडून मर्यादेबाहेर वर्तन करून गोंधळ घालत संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न करेल, अशा गोंधळी खासदारांना २ वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियम सरकारने बनवावा,” अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीय.

रामदास आठवले म्हणाले, “कोणत्याही विषयावर संसदेत चर्चा व्हावी. एका मर्यादेपर्यंत विरोध प्रदर्शन व्हावे. मात्र, विरोधासाठी संसदेचे कामकाज रोखणे अत्यंत चूक आहे. सलग ३ दिवसांपर्यंत गोंधळ घालून संसदेतील कामकाज रोखणे चूक आहे. यामुळे संसदेचा बहुमोल वेळ वाया जातो. त्यातून देशाचे नुकसान होते. त्यामुळे सलग ३ दिवस गोंधळ घातल्यानंतरही जो खासदार चौथ्या दिवशी संसदेत गोंधळ घालेल त्याला २ वर्षांसाठी निलंबित करावे. सरकार पक्षाचा असो की विरोधी पक्षाचा खासदार असो सर्व खासदारांसाठी हा नियम बनवावा.”

महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प उभरण्याची मागणी पुढे आली आहे. या मागणीला रामदास आठवले यांनी पाठिंबा दिलाय. तसेच त्यासाठीचा प्रस्ताव आल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे प्रयत्न करू, असं आश्वासन आठवले यांनी दिलं.

हे ही वाचा:

कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा हे सांगण्यासारखं

काय आहे राकेश झुनझुनवाला आणि अकासा एरलाईन्स कनेक्शन?

पेगासिसची चिंता सोडा ‘पेंग्वीनची’ चिंता करा

‘ही’ अट मान्य केली, तर टेस्लाच्या गाड्या स्वस्त होणार

“आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खेळा नाही, तर मोदींच्या समर्थनाचा मेळा होणार आहे. २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार निवडून येईल. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात किती राजकीय पक्ष एकत्र येतील हा प्रश्नच आहे. विरोधी पक्षात एक नेता कुणी नाही. त्यामुळे मोदींसमोर कोणतेही मोठे आव्हान नाही,” असे रामदास आठवले यांनी सांगितलं.

Exit mobile version