भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज आता राजकारणात सक्रीय होणार आहेत. भाजपने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून त्यांना दिल्ली भाजपच्या कायदेशीर कक्षाचे सहसंयोजक बनवण्यात आले आहे. हे पद मिळाल्यानंतर बांसुरी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. सध्या, बांसुरी स्वराज सर्वोच्च न्यायालयात क्रिमिनल लॉयर म्हणून वकिली करत आहेत.
दिल्ली भाजपचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांनी बांसुरी स्वराज यांना कायदेशीर सेलचे सह-संयोजक म्हणून नियुक्त केले, त्यानंतर त्यांनी राज्य युनिटमधील त्यांच्या पहिल्या नियुक्तीमध्ये पक्षाच्या पूर्णवेळ प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
हे ही वाचा:
तीन-चार वर्षात देशात उभारली जातायेत ‘इतकी’ विमानतळे
आगीत साकीनाकाजवळील दुकान भस्मसात, एकाचा मृत्यू
विश्वविजेती निखत झरीन गोपीचंदच्या पावलावर पाऊल टाकणार, उघडणार बॉक्सिंग अकादमी
कॅलिफोर्नियाच्या गुरुद्वारात झाडल्या गोळ्या, २ जण जखमी
यासंदर्भात जारी केलेल्या नियुक्ती पत्रात सचदेवा म्हणाले की, स्वराज यांची नियुक्ती तात्काळ लागू होईल. भाजपला अधिक मजबूत करण्यासाठी त्या काम करतील, अशी अपेक्षा आहे. पक्षाकडून ही जबाबदारी मिळाल्यानंतर बांसुरी यांनी नियुक्तीपत्र ट्विट करत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहाजेपी नड्डा, बीएल संतोष, वीरेंद्र सचदेवा, दिल्ली भाजपचे आभार मानले आहेत.
बांसुरी या दिवंगत सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांच्या एकुलत्या एक कन्या आहेत. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे.शिक्षण पूर्ण झाल्यापासून त्या दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात क्रिमिनल लॉयर म्हणून प्रॅक्टिस करत आहेत.