सर्वज्ञानी सुषमा अंधारेंनी ‘त्या’ प्रकरणी दिलगिरीचे पत्र द्यावे, अन्यथा…

नीलम गोऱ्हेंचा इशारा

सर्वज्ञानी सुषमा अंधारेंनी ‘त्या’ प्रकरणी दिलगिरीचे पत्र द्यावे, अन्यथा…

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या आमदार रवींद्र धंगेकरांना सभागृहात बोलू देत नाहीत अशा आशयाचा व्हिडीओ ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रसिद्ध केला होता. मुळात धंगेकर हे विधान परिषद सभागृहाचे सदस्य नाहीत त्यामुळे तात्काळ सुषमा अंधारे यांच्यवर हक्कभंग आणावा, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली आहे. त्यानंतर सुषमा अंधारे यांना आठ दिवसात दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले आहे. दिलगिरीचे पत्र न आल्यास आमदार प्रविण दरेकरांना हक्कभंग मांडण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपानंतर रविंद्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य आहेत तर मग विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे त्यांना बोलू कशा देत नाहीत? असा आक्षेपाचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यानंतर सुषमा अंधारेच्या मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “धंगेकर इकडे सदस्य नसताना मी कसे बोलू दिले नाही. याचे कोडे उलगडलेले नाही. अज्ञानी लोकांकडून चूक झाल्यास मी समजू शकते पण जे स्वत:ला ज्ञानी समजतात अशावेळी त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचे तरी सौजन्य असू नये. त्या व्यक्तीला जाणीव करून दिली पाहिजे. सुषमा अंधारेंनी दिलगिरी व्यक्त करायला हवी. आठ दिवसांत दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रविण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईन.”

हे ही वाचा:

निलंबित खासदारांना मतदानाचा हक्कही नाही; दैनंदिन भत्त्यापासूनही मुकावे लागणार!

तामिळनाडूत पावसाचा तडाखा, १० जणांचा मृत्यू!

डॉ. हेडगेवार स्मृतीस्थळाच्या दर्शनाने ऊर्जा, प्रेरणा मिळते

काँग्रेसची भारत जोडो यात्रा २ जानेवारीमध्ये सुरू होण्याची शक्यता!

प्रकरण काय?

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर यांना बोलण्याची संधी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली नसल्याचा आरोप करत व्हिडिओ व्हायरल केला होता. दरम्यान यावरूनच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आक्रमक भूमिका घेत धंगेकर विधान परिषदेचे सदस्य नसतांना त्यांना बोलू न देण्याचा विषयच येत नसल्याचे मत मांडले. तसेच, माहिती न घेता आरोप करणे चुकीचे असून, सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव दरेकर यांनी विधान परिषदेत मांडला.

Exit mobile version