25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारणसुषमा अंधारेंचा उद्धव ठाकरेंबद्दलचा 'तो' व्हीडिओ व्हायरल

सुषमा अंधारेंचा उद्धव ठाकरेंबद्दलचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले. मात्र त्यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली होती.

शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट बाहेर पडल्यानंतर सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिवसेनेच्या बांधणीसाठी सज्ज झाले आहेत. नव्या सदस्यांच्या नोंदणी सुरू आहेत. काही लोक पक्षात प्रवेशही करत आहेत. त्यात आता राष्ट्रवादीच्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशसोहळा पार पडला.

त्यानिमित्ताने अंधारे यांचा एक जुना व्हीडिओ समोर आला आहे. त्यात त्या म्हणतात की, उद्धव ठाकरे बोंबा मारत आहेत की दहीहंडी साजरी करणारच. तर करावी त्यांनी दहीहंडी साजरी. एकदा काय १०० वेळा कर. पण सगळ्यात तळातल्या थराला तुम्ही उभे राहा आणि सगळ्यात वरच्या थरावर आदित्यला उभे करा आणि खेळा काय खेळायचे ते दहीहंडी.

हे ही वाचा:

… म्हणून तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचे १ ऑगस्टपासून चित्रपट शूटिंगला टाळे

‘चिकन खुद फ्राई होने के लिए आ गया’

संसदेत सोनिया गांधी- स्मृती इराणी भिडल्या! अधीररंजन प्रकरण चिघळले

संजय राऊतांविरोधातील जबाब मागे घ्या, अन्यथा… स्वप्ना पाटकर यांना धमकी

 

सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्यावर उपसभापती व शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. त्यावेळी अंधारे यांना अश्रु आवरले नाहीत. उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेला या स्थितीत सुषमा अंधारे यांनी आधार दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानले. अंधारे यांनीही शिवसेना पक्षप्रमुखांचे आभार मानले.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांचा मोठा गट शिवसेनेतून फुटल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी मिळाली असून शिवसेनेत सध्या चिंतेचे वातावरण आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा