28 C
Mumbai
Thursday, October 3, 2024
घरराजकारणकाँग्रेसचे सुशीलकुमार शिंदेंना सावरकरांविषयी उच्च कोटीचा आदर!

काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदेंना सावरकरांविषयी उच्च कोटीचा आदर!

काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आणण्याची गरज असल्याचा शिंदेंचा सल्ला

Google News Follow

Related

काँग्रेस नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे राजकीय आत्मचरित्र ‘फाईव्ह डेकेड्स इन पॉलिटिक्स’ नुकतेच प्रकाशित झाले. मात्र, यात सुशीलकुमार शिंदेंनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मांडलेल्या मतांमुळे काँग्रेसची कोंडी झाल्याचे चित्र उभे राहिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल सुशीलकुमार शिंदेंनी त्यांच्या राजकीय आत्मचरित्रात आदरयुक्त उल्लेख केला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पदोपदी अपमान करणाऱ्या काँग्रेसची यातून कोंडी झाली आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सुशीलकुमार शिंदेंनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, अस्पृश्यता, जातीयवाद संपवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडून मोठे प्रयत्न झाले आहेत. सावरकर हे विज्ञानवादी होते, असं मत त्यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कौतुक करताना त्यांनी म्हटले आहे की, “माझ्या मनात सावरकरांविषयी उच्च कोटीचा आदर आहे. त्यामुळे १९८३ ला नागपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला हजर राहिलो. सावरकरांना पाठिंबा दिलेल्या मुद्द्द्यांवर मी ठाम राहिलो. अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मोठे प्रयत्न केले. मी स्वतः मागासवर्गातील असल्याने त्यांच्या प्रयत्नांचे मला विशेष महत्त्व वाटते,” असे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “सावरकरांचा मुद्दा निघाला की त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीवर इतका भर का दिला जातो, याचं मला आश्चर्य वाटतं. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. सावरकरांमधला तत्वज्ञ आणि विज्ञानवादी पैलू आपण पाहू शकत नाही का? सामाजिक समता आणि दलितांच्या उद्धाराचा मुद्दा घेऊन सावरकर उभे राहिले. सावरकरांबाबत संकुचित विचार हे आपल्यासमोरचं एक आव्हान आहे. प्रदीर्घ काळ राजकारणात काम केल्यानंतर मला वाटतं की, काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे,” असा सल्ला सुशीलकुमार शिंदेंनी काँग्रेसला देत परखड मत मांडलं आहे.

हे ही वाचा : 

दिल्लीत २ हजार कोटी रुपयांचे ५०० किलोहून अधिक कोकेन जप्त!

चाकूचा धाकाने आधी दागिने लुटले नंतर बलात्कार

अनेक दशके सत्ता राबवूनही काँग्रेसने महिलांची कुचंबणा केली!

इस्रायलच्या हल्ल्यांनंतर बैरुतचे नागरिक घरे सोडून ‘कारमध्ये’

सुशीलकुमार शिंदे यांचे ‘फाईव्ह डेकेड्स इन पॉलिटिक्स’ हे आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. हे आत्मचरित्र सध्या चर्चेला कारण ठरलं आहे कारण यात शिंदेंनी मांडलेली सावरकरांबद्दलची मते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सावरकरांबद्दल असलेली भूमिका ही जगजाहीर असून यामुळे आता काँग्रेसची कोंडी होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा