पेयजल योजनेसाठी केंद्र सरकारकडून सर्वेक्षणाला सुरूवात

पेयजल योजनेसाठी केंद्र सरकारकडून सर्वेक्षणाला सुरूवात

जल जीवन मिशन (शहरी) मार्फत सर्व ४,३७८ शहरांसाठी नळजोडणीद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी १० शहरांमध्ये केंद्र सरकारने सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

सर्वांना नळाचे पाणी, स्वच्छ भारत अभियान २.०- अर्थमंत्र्यांची घोषणा

गृहनिर्माण आणि शहर मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार या शहरांतील पेय जल सर्वेक्षणात सांडपाण्याच्या पुनर्वापर, पाण्याचे समन्यायी वाटप, पाण्याच्या स्त्रोतांचे गुणवत्ता आणि प्रमाणाच्या संदर्भातील नकाशाकरण करणे हे काम देखील केले जाणार आहे. या पायलट प्रोजेक्टचा अभ्यास डिजीटल माध्यमांतून केला जाणार आहे.

सुरूवातीला देशातील १० शहरांत ही योजना राबवली जाणार आहे. यात आग्रा, बदलापूर, भुवनेश्वर, चूरू, कोची, मदुराई, पतियाळा, रोहतक, सुरत आणि तुमाकुरू या शहरांचा समावेश आहे.

या सर्वेक्षणातील निष्कर्षांच्या आधारावर ही योजना सर्व अमृत (अटल मिशन फॉर रिजुविनेशन ऍण्ड अर्बन ट्रान्स्फॉर्मेशन) शहरांसाठी राबवण्यात येईल.

या सर्वेक्षणासाठी नागरिकांच्या प्रत्यक्ष मुलाखती, त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याही मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मुलाखतींसोबच पाण्याची प्रत्यक्ष चाचणी करून त्याद्वारे निष्कर्ष काढले जाणार आहेत. गृहनिर्माण आणि शहर मंत्रालयानुसार जल जीवन मिशन (शहरी) ४,३७८ नगरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी बनविण्यात आली आहे.

Exit mobile version