शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी

शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पित्ताशयावर आज यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. यासाठी त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले होते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ३० मार्चला पोटात दुखत असल्यामुळे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सात दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता. त्यानंतर १५ दिवसांनी आज त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे शरद पवारांना रविवारी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज त्यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची तब्येत स्थिर असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी याच आठवड्यात

सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू

लॉकडाऊनच्या भीतीने सेन्सेक्समध्ये मोठी पडझड

गरज अकार्यक्षमतेला लस टोचण्याची!

३ एप्रिल रोजी शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यावेळी त्यांना सात दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. शरद पवारांवर एक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ३० मार्च रोजी पित्ताशयामध्ये अडकलेला मोठा खडा बाहेर काढण्यात आला. एन्डोस्कोपीद्वारे ही शस्त्रक्रिया पार पडली होती. या शस्त्रक्रियेमुळे शरद पवारांना पोटदुखीपासून आराम मिळणार आहे. मात्र, शरद पवारांच्या गॉल ब्लॅडरमध्ये छोटे-छोटे खडे असल्याने काही दिवसात त्यांचे गॉल ब्लॅडरही काढण्यात येणार आहे.  दरम्यान, गॉल ब्लॅडर जरी शस्रक्रिया करुन काढण्यात येणार असले तरी हा अवयव काढल्यानंतर शरद पवारांचे काहीही नुकसान होणार नाही, अशी माहिती शरद पवारांवर उपचार करणारे डॉ. मायदेव यांनी दिली होती.

Exit mobile version