गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात लावणीचा फड गाजवणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या आता राजकारणाचा फड गाजवायला सज्ज झाल्या आहेत. सुरेखा पुणेकर या आता आपली राजकीय इनिंग सुरू करणार असून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. गुरुवार, १६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सदस्यत्व घेणार आहेत.
महिनाभरापूर्वी सुरेखा पुणेकर यांनी राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली होती. विधानसभा निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आगामी काळात सुरेखा पुणेकर राजकीय प्रवेश करणार याचा अंदाज बांधला जात होता. त्यानुसार आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून त्या आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहेत. इतके वर्ष कलेची सेवा केली आता राजकारणात येऊन मला समाजाची सेवा करायची आहे असे सुरेखा पुणेकर यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
सुनेला मारहाण केल्या प्रकरणी काँग्रेस आमदारावर गुन्हा
शिवसेना उत्तर प्रदेश निवडणूकीच्या रिंगणात! यावेळी तरी डिपाॅझिट वाचणार?
पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणारा ख्रिस्ती भोंदू अटकेत
भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री! मोदी-शहांचे धक्कातंत्र कायम
सुरेखा पुणेकर यांना विधानपरिषदेवर जाण्याचीही इच्छा होती. त्यासाठी त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क केल्याचीही माहिती समोर आली होती. पण तेव्हा पक्षाकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नसल्याचेही सांगितले जात होते. त्यानंतर आता सुरेखा पुणेकर या अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकीय इनिंग सुरू करायला तयार झाल्या आहेत.