राहुल गांधी यांना धक्का, मानहानीबद्दल झालेली शिक्षा कायम

खासदारकीही रद्द राहणार, आता उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय

राहुल गांधी यांना धक्का, मानहानीबद्दल झालेली शिक्षा कायम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका बसला आहे. मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यावर मानहानीच्या खटल्यात दोषी ठरलेल्या राहुल गांधींना सुरत उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. मोदी आडनाव बदनामीच्या खटल्यातील त्यांच्या शिक्षेला आव्हान देणारी त्यांची याचिका सुरत न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांना उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.

या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर न्यायाधीश रॉबिन मोघेरा यांनी गुरुवारी हा निकाल दिला. त्यानुसार त्यांनी राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या २ वर्षांच्या शिक्षेत कोणताही दिलासा दिलेला नाही. यानंतर, गांधी उच्च न्यायालयात न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लढण्यासाठी तयार असल्याचे वृत्त आहे. त्याच्या शिक्षेविरोधात ते लवकरच याचिका दाखल करतील अशी अपेक्षा आहे. राहुल गांधी यांना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जामीन मंजूर झाला होता. सुरत सत्र न्यायालयाने ३ एप्रिल रोजी भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला होता.

राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक प्रचार कार्यक्रमात बोलतांना “सर्व चोरांना मोदी हे आडनाव कसे आहे?” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली होती. त्यानंतर राहुलच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर न्यायालयाने तक्रारदार आणि राज्य सरकारला नोटीसही बजावली आहे. हा आदेश २० एप्रिलपर्यंत राखून ठेवण्यात आला होता.

राहुल यांनी मोदींच्या आडनावाबाबत केलेल्या बदनामीचा खटला न्याय्य नाही. तसेच या प्रकरणात जास्तीत जास्त शिक्षेची गरज नव्हती असा युक्तिवाद राहुल गांधींच्या वकिलाने न्यायालयात केला होता. , वरिष्ठ वकील आरएस चीमा म्हणाले होते की फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३८९ मध्ये अपील प्रलंबित असलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची तरतूद आहे. सत्ता हा अपवाद आहे, मात्र न्यायालयाने शिक्षेच्या परिणामांचा विचार करावा, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

राज्यातील शाळेची घंटा १५ जूनला वाजणार

राज्याच्या कारागृहातील कैद्यांवर असेल आता ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर

येमेनमध्ये आर्थिक मदतीच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी ८० पेक्षा जास्त लोक ठार ठार, १००जखमी

कुत्र्यांनाही मिळाला स्थानिक अधिवासाचा हक्क, त्यांच्या परिसरातून हाकलता येणार नाही

वायनाडचे माजी लोकसभा खासदार राहुल गांधी यांना २३ मार्च रोजी सुरत येथील कनिष्ठ न्यायालयाने भारतीय दंड संहित्याच्या कलम ४९९ आणि ५०० ​​(मानहानी) अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती .२०१३ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राहुल गांधी यांना दुसऱ्याच दिवशी खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले आणि दोषी ठरलेल्या आणि दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या कोणत्याही खासदार किंवा आमदाराला आपोआप अपात्र ठरवण्यात येते.

Exit mobile version