सुप्रिया ताई ‘आधुनिक आनंदीबाई’ बनू नका!

भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांची टीका

सुप्रिया ताई ‘आधुनिक आनंदीबाई’ बनू नका!

संसद भवन परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे भव्य पुतळे हटविण्यात आले आहेत. हे अतिशय संतापजनक असून सरकारने हे पुतळे हटवून तमाम देशवासियांचा अपमान केल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.यावर भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत सुप्रिया सुळेंना उत्तर दिल आहे.संसदेच्या प्रांगणातले पुतळे हटवले जात नसून नवीन जागी हलवले जात आहेत.त्यामुळे संसदेच्या प्रांगणातले पुतळे हटवले जात असल्याचं असत्य पसरवून उगाच ‘ध’चा ‘मा’ करणाऱ्या आधुनिक आनंदीबाई बनू नका, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत सुप्रिया सुळेंना उत्तर दिल आहे.यामागील सत्य आणि सुप्रिया सुळेंनी पसरवलेलं असत्य याचा दोन्ही संदर्भ देत चित्रा यांनी म्हटले की, आपले महापुरूष तुमच्यासाठी केवळ प्रचारात मिरवण्याची गोष्ट असेल. आमच्यासाठी ते प्रातःस्मरणीय आहेत. त्यामुळे संसदेच्या प्रांगणातले पुतळे हटवले जात असल्याचं असत्य पसरवून उगाच ‘ध’चा ‘मा’ करणाऱ्या आधुनिक आनंदीबाई बनू नका. हे पुतळे नवीन जागी हलवले जाताहेत, हटवले जात नाहीयेत.

हे ही वाचा:

पाकिस्तानविरोधातील अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार; सौरभ नेत्रावलकर आहे तरी कोण?

टी२० विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेकडून पाकिस्तानला पराभवाचा धक्का!

सलग आठव्यांदा आरबीआयचा रेपो रेट जैसे थे स्थितीत

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सफाई कर्मचारी, मजूर, केंद्रीय योजनांचे लाभार्थी उपस्थित राहणार

त्या पुढे म्हणाल्या की, आत्मनिर्भर भारताच्या स्वाभिमानाची खूण म्हणजे नवीन संसद भवन..ज्यावर तुम्हीच बहिष्कार घातला होता कारण तुम्हाला इंग्रजांनी उभारलेले जुने संसद भवन प्रिय होत..आता मात्र तुम्हाला जळजळतय… आता सहन ना झाल्यानेच खोट्या बोंबा मारणं, थापा मारणं सुरू केलं आहे..या थापांचा बाप कोण हे जनतेला चांगलंच ठाऊक आहे..?

भारतीय जनता पक्षाचा विचार आणि संस्कार आत भिनलेले असतात आणि विरोधकांचे विचार हे प्रचार आणि फार फार तर वचननाम्यापुरतेच झळकतात. म्हणूनच तर स्टंटबाजीत तुमच्याकडून श्रद्धेय बाबासाहेबांचा फोटो फाडला जातो, शिवरायांचा खोटा इतिहास नव्याने लिहिण्यात काँग्रेसचा हात तर कोणीच धरू शकत नाही… लवकरच संसदेत पाऊल ठेवाल तेव्हा या महापुरूषांसमोर नतमस्तक होऊन खोटं बोलल्याचं प्रायश्चित्त घ्याल, अशी अपेक्षा आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Exit mobile version