28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणउद्धव ठाकरेंशी ताडोबाबद्दल आणि वाघांच्या वाढलेल्या संख्येबदद्ल चर्चा

उद्धव ठाकरेंशी ताडोबाबद्दल आणि वाघांच्या वाढलेल्या संख्येबदद्ल चर्चा

खासदार सुप्रिया सुळे यांनी विषय टाळला

Google News Follow

Related

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानंतर त्या भेटीत काय झाले याविषयी सगळ्यांना उत्सुकता असली तरी त्यात निव्वळ गप्पा झाल्याचे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी या बैठकीत झालेल्या चर्चेच्या विषयाला फाटा देत उद्धव ठाकरे यांच्या आपली ताडोबा अभयारण्यावर चर्चा झाल्याचे सांगितले. ताडोबात वाघ वाढलेले आहेत. त्यामुळे ते माणूस आणि प्राण्यांचा जो संघर्ष सुरू झाला आहे. आदिवासींच्या हक्काचा मुद्दा आहे, यावर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. त्याआधी यशवंतराव चव्हाण सेंटरलाही आमची याच विषयावर बैठक झाली होती. गावितही त्या बैठकीला होते. वन कायदे, मनुष्य आणि प्राणी यांच्यातील संघर्ष अशा विषयांवर विधेयके येत आहेत त्यावर आम्ही बोललो.

खासदार सुळे म्हणाल्या की, खरं तर मी बराच वेळ या बैठकीत नव्हते. सिंहासन सिनेमाचा कार्यक्रम होता. मला उशीर झाला. मी झाला तेव्हा घरगुती गप्पा सुरू होत्या. माझी मुलगी इंग्लंडवरून आली आहे. ती काय करणार याविषयी चर्चा झाली. घरातील मुलांबद्दल चर्चा झाली. एकूणच सगळ्या घरगुती गप्पा होत्या. आमच्या या बैठकांबाबत चर्चा टीव्हीवर जास्त आणि आमच्यात कमी होते असे वाटते.

सिल्व्हर ओकवर उद्धव ठाकरेंना जावे लागते आहे, बाळासाहेब ठाकरे असताना मातोश्रीवर सगळे येत असत यावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात येत आहे, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्या आईचे संस्कार झालेले आहेत. वयाने कुठल्याही व्यक्तीच्या घरी जाताना, प्रेमाने जाताना मोठेपणा किंवा कमीपणा वाटत नाही. सर्वसाधारण मराठी कुटुंबातील संस्कृती आहे. मी हक्काने उठून मोठ्या भावाकडे जाणे यात काय मोठेपणा किंवा कमीपणा. नात्यातील ओलावा महत्त्वाचा वाटतो. इगो नसला पाहिजे. महाभारतात ते सांगितले आहे. सगळे संतही शिकवतात. प्रेमाच्या नात्यात कोणीही मोठे छोटे नसते.

हे ही वाचा:

कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने दिली ५२ नवीन चेहऱ्यांना संधी

म्यानमारच्या नागरिकांवर लष्कराचा सतत २० मिनिटे गोळीबार, बॉम्बहल्ला

रशियात ज्वालामुखी फुटला, २० किमी उंचीपर्यंत राखेचे ढग उसळले

मविआचे काय होणार? रोहीत पवारांची ‘ब्लॅक कॉफी पे चर्चा…

अदानींच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नाही, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडेल का, असा प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एक महिना आमची हीच भूमिका आहे. तुम्ही लोकसभेत फॉलो केले नाही. ईव्हीएमचा विषय वेगळा. जेपीसीचे उदाहरण देते. संजय राऊत यांच्यावरही चौकशी सुरू आहे. त्याचे अध्यक्ष सत्ताधआरी आहे. कमिटीतला जास्त लोक सत्तेत असते. जेपीसीविरोधातली सत्तेत भाजपा जास्त लोक आहे. पवार काय म्हणाले हो लोक ऐकत नाहीत. पवार बोलतात आणि १० दिवस चर्चा होते आणि नंतर लोक म्हणतात त्यांना असे म्हणायचे होते ६० वर्षात असेच होत आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा