राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार गट विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा याशिवाय शरद पवार यांच्या विश्वासू आणि राष्ट्रावादीच्या लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या सोनिया दुहान या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच सोनिया दुहान यांनी पक्ष सोडल्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण देत या विषयावर पूर्णविराम लावला आहे.
सोनिया दुहान म्हणाल्या की, “मी पक्ष सोडलेला नाही, पण काही दिवसांतचं पक्ष सोडणार आहे,” असं सोनिया दुहान म्हणाल्या. तसेच त्यांनी हे ही स्पष्ट केले की, “मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. ज्यावेळी अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या काही जणांनी वेगळा निर्णय घेतला, त्यावेळी सुप्रीया सुळेही तिथे दिसल्या होत्या. मग त्यांनीही पक्ष सोडला, असं म्हणायचं का? आमच्यासाठी शरद पवारच आमचे लीडर आहेत. शरद पवार आमचे नेते होते, आहेत आणि यापुढेही राहतील. पक्ष सोडायचा असेल तर निवडणुकीच्या ऐन काळातचं सोडला असता पण अशा वेळी सोडणार आहे जेव्हा हे लोक म्हणत आहेत की राज्यात २५ ते ३० जागा मिळतील. मनात नसताना हा निर्णय घ्यावा लागत आहे.” असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं. मात्र, हे बोलतानाच त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.
“शरद पवारांची मुलगी म्हणून सुप्रीया सुळे यांच्यासाठी आम्हाला आदर आहे. पण, आमच्या नेत्या बनण्यात त्यांना मोठं अपयश आले आहे. प्रमुख म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं नाही आणि यामुळेच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे,” अशी टीका सोनिया दुहान यांनी केली आहे. सुप्रिया सुळेंना मंथन करण्याची गरज आहे. एकनिष्ठ असलेली लोकं त्यांना का सोडून जात आहेत, याचा विचार त्यांनी करावा, असा सल्ला सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळे यांना दिला आहे.
हे ही वाचा:
केजरीवालांना दणका, जामीन मुदतवाढ अर्जावर सुनावणीस नकार
“पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या अस्तित्वाची लढाई”
मांसमच्छीच्या दुकानांमुळे सोकावलेल्या कुत्र्यांनी केला मुलीवर हल्ला, मुलीचा मृत्यू!
९० एकर जमीन बळकावून शेख शाहजहानने २६१ कोटी रुपये कमावले!
लवकरच आपण पक्ष सोडणार आहे. कदाचित या भूमिकेमुळे मला काढण्यातही येईल पण तरीही सध्या आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, असं मत त्यांनी मांडलं आहे. सुप्रिया सुळे यांच्यासंबंधीचे मुद्दे शरद पवार यांच्यासमोर वारंवार मांडले होते परंतु त्यावर काही पुढे झाले नाही. शेवटी कितीही झाले तरी ती त्यांची मुलगी आहे आणि आम्ही बाहेरील व्यक्ती आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.