लोक आग्रहास्तव सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्षा करण्यात आल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात शरद पवारांनी दिल्लीमध्ये मोठी घोषणा करत खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे सांगितले. दोघांकडे देखील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याच्या निर्णयावर भाष्य केले. शरद पवार म्हणाले चर्चेतून सहकाऱ्यांना जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. इतर राज्यातील संघटना वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. २३ जूनला पाटनामध्ये विरोधकांची सभा आहे. भाजपाची ताकद जास्त असणाऱ्या ठिकाणी विरोधकांना एकत्र आणणार आहोत. लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा होणार आहे, असे शरद पवार म्हणाले.
लोक आग्रहास्तव सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्षा करण्यात आले आले. इतर सहकाऱ्यांवर जबाबदारी देण्याचा निर्णय आधीच केला होता. पक्षाध्यक्षाची जागा खाली नाही जेव्हा जागा खाली होईल तेव्हा बघू, असं शरद पवार म्हणाले. अजित पवार नाराज नसल्याचेही ते म्हणाले. अजित पवार विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. तसेच जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत, असे म्हणत शरद पवारांनी अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उत्तर दिले.
हे ही वाचा:
चॅनेलवर ७२ हूरेंवरील कार्यक्रमात पॅनलिस्टची हाणामारी
सादरीकरणावेळी मंचावरचं भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन
धुळ्यात अनधिकृत टिपू सुलतान स्मारक रात्री उशिरा हटविले
डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा निर्णय
देशातील व्याप पाहिल्यावर एका व्यक्तींकडून देश सांभाळला जाणे अशक्य होते. निवडणुकीसाठी आता वर्षभरापेक्षा कमी कलावधी आहे. यामुळे वर्षभरात एका व्यक्तीकडून सर्व ठिकाणी पोहचू शकलो नसतो. त्यामुळे दोन अध्यक्ष नेमले गेले आहेत. एका कार्यकारी अध्यक्षाला चार ते सहा राज्य देण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून २०२४ मध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये पक्ष पोहचणार आहे, असे शरद पवार म्हणाले.