राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमांवरून आपल्याला कोरोना झाल्याचे जाहीर केले आहे. सुप्रिया सुळे यांच्या सोबतच त्यांचे पती सदानंद सुळे हे देखील कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. बुधवार, २९ डिसेंबर रोजी सुप्रिया सुळे या कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे.
“मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.” असा संदेश सुप्रिया सुळे यांनी आपल्या समाज माध्यमांवरील खात्यांवर पोस्ट केला आहे. सुप्रिया सुळे या काल म्हणजेच २९ डिसेंबर रोजी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीच्या लग्नाला गेल्या होत्या. तर त्या आधीपासून त्या अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या.
मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.
— Supriya Sule (@supriya_sule) December 29, 2021
हे ही वाचा:
राजेश टोपेंना मिळणार ‘घोटाळेरत्न’ पुरस्कार
रणझुंजार नव्हे तर घरझुंजार! अतुल भातखळकर यांची टोलेबाजी
‘मुख्यमंत्र्यांचे पत्र धमकीवजा’
मालेगाव बॉम्बस्फोट: योगींचे नाव घेण्यास परमबीर सिंग यांनी सांगितले
त्यामुळे आता राज्यात कोरोनाची तिसरी लाट दाखल झाली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा हाहाकार पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाच्या ओमीक्रॉन व्हेरियंटच्या कचाट्यात राज्याचे नागरिक येताना दिसत आहेत. दिवसा गणिक राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. सुप्रिया सुळे यांच्या आधी काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड या देखील कोरोना बाधित झाल्या आहेत.