शुक्रवार, १७ डिसेंबर रोजी पेपरफुटी प्रकरणात अटक झालेले महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे हे परीक्षा विभागातील वाझे आहेत असा घणाघात भाजपा महाराष्ट्राने केला आहे. सुपे यांच्या अटके नंतर राज्यात भाजपा आक्रमक होताना दिसत असून भाजपा नेते सरकारला धारेवर धरत आहेत. अशातच महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरूनही सरकारवर निशाणा साधला गेला आहे. तर यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांना अभय वाटत आहे का? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. या नोकर भरतीची सीबीआय (CBI) मार्फत चौकशी व्हावी अशी मागणीही भाजपाने केली आहे.
टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. कालपासून, म्हणजेच गुरुवार, १६ डिसेंबर पासून सुपे यांची पोलिसांमार्फत चौकशी सुरु होती. अखेर शुक्रवारी त्याच्या विरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक
बेस्ट मुख्यमंत्र्यांचा घरातून चालवलेला ‘बेस्ट कारभार’
‘बलात्कार टाळू शकत नसाल तर त्याची मजा घ्या’ काँग्रेस आमदाराची मुक्ताफळे
शिवसेनेला ठेंगा, निधी वाटपात राष्ट्रवादी, काँग्रेसची बाजी
यावरून ठाकरे सरकारच्या विरोधात टिकेची झोड उठलेली दिसत आहे. महाराष्ट्र भाजापाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून या प्रकरणात भाष्य केले असून सरकारवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे हे परीक्षा विभागातील वाझे.सुपे कुणाच्या आदेशाने वसुली करायचे? मागील २ वर्षात राज्यात झालेल्या नोकर भरतीची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय (CBI) कडून झाली पाहिजे.परिक्षा विभागातील वाझे चा बॉस कोण? हे महाराष्ट्रातील जनतेसमोर आलं पाहिजे.” असे महाराष्ट्र भाजपाने म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे हे परीक्षा विभागातील वाझे.सुपे कुणाच्या आदेशाने वसुली करायचे? मागील 2वर्षात राज्यात झालेल्या नोकर भरतीची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणा CBI कडून झाली पाहिजे.परिक्षा विभागातील वाझे चा बॉस कोण?हे महाराष्ट्रातील जनतेसमोर आलं पाहिजे pic.twitter.com/sBYu9wSmbQ
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 17, 2021
ठाकरे सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील भरती परीक्षांचा गोंधळ पाहायला मिळत आहे. एमपीएससी, आरोग्य भरतीच्या परीक्षांच्या पाठोपाठ म्हाडाच्या परीक्षेतही गोंधळ पाहायला मिळाला. परीक्षेच्या आदल्या रात्री परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर करण्यात आले. तर त्यानंतर या परीक्षेत पेपरफुटी झाल्याचेही समोर आले.