काँग्रेसचे पंजाब राज्याचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्ली येथील केंद्रीय भाजपा कार्यालयात पक्ष प्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे काँग्रेस पक्षाने आपला आणखीन एक दिग्गज नेता गमावल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सुनील जाखड यांचे कुटुंब गेले पन्नास वर्ष काँग्रेस पक्षासोबत जोडलेले आहे. पण काही महिन्यांपूर्वी जाखड यांनी काँग्रेस पक्षाच्या कारभारावर गंभीर टीका केली होती. नुकत्याच पार पडलेल्या पंजाब राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. नंतर काँग्रेसने जाखड यांना शिस्तभंगाची नोटीस पाठवली होती. जाखड यांनी केलेल्या विधानांचा फटका पक्षाला निवडणुकीत असल्याचा ठपका काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर ठेवला होता.
हे ही वाचा:
‘सत्तेचा टांगा पलटी, आणि सत्ताधारी फरार’
राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून गुन्हा दाखल
पंजाब पोलिसांनी केला हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश, दोघांना अटक
मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींना न्यायालयाचा दिलासा! अटकपूर्व जामीन मंजूर
त्या वरून नाराज झालेल्या जाखड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यावेळी त्यांनी पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप केले होते. राहुल गांधी हे निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना मित्र आणि शत्रू यांची ओळख नाही असे जाखड यांनी म्हटले होते. तर पंजाबच्या प्रभारी असलेल्या अंबिका सोनी यांच्यावरही त्यांनी आरोप केले होते.
आपण हिंदू असल्यामुळेच आपल्याला पंजाबचे मुख्यमंत्री बनवले नाही असा आरोपही त्यांनी पक्षावर केला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवल्यानंतर पक्षातील बहुतांश आमदार हे आपल्या बाजूने होते. पण केवळ हिंदू असल्यामुळे आपल्याला मुख्यमंत्री बनवण्यात आले नाही असा आरोप त्यांनी केला होता. आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.