ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा भांडारी यांचे निधन

भाजपाचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा भांडारी यांचे निधन

सुमित्रा भांडारी यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी रात्री पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे.वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
सुमित्रा माधव भांडारी म्हणजे पूर्वाश्रमीच्या वासंती वेलणकर होत.परभणीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक नानासाहेब वेलणकर यांच्या त्या कन्या होत्या.सुमित्रा ताई यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने भांडारी व वेलणकर कुटुंबीय तसेच नातेवाईक, मित्र परिवार यांना मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा:

अजित पवार माफी मागा, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही

अमेय घोले उद्धव गटाकडून शिंदे गटाच्या वाटेवर?

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताय मग हे वाचाच!

‘विज्ञानामुळे महिलांचे सशक्तीकरण आणि महिलांमुळे विज्ञान सशक्त होते’

सुमित्राताई विद्यार्थी दशेपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये कार्यरत होत्या. याच काळात परभणीत अभाविपच्या माध्यमातून मोठे काम केले. विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व केले होते. लग्न झाल्यानंतरही त्या पुणे व कोकण विभागात विविध सामाजिक संघटना, संस्थाच्या माध्यमातून कार्यरत होत्या. बस्तरमधील वनवासी कल्याण आश्रमाच्या भानपुरी वसतिगृहात देखील प्रारंभीच्या काळात पूर्णवेळ कार्यकर्त्या म्हणून कार्यरत होत्या.सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

सुमित्राताई यांचे पार्थिव माधव भांडारी यांच्या प्रभात रस्त्यावरील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये दुपारी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Exit mobile version