27 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरराजकारण'आमच्या हयातीत एकदा तरी रस्ते उत्कृष्ट प्रतीचे करण्याचे कष्ट घ्या!

‘आमच्या हयातीत एकदा तरी रस्ते उत्कृष्ट प्रतीचे करण्याचे कष्ट घ्या!

Google News Follow

Related

ट्विट करत सुमीत राघवनची मुख्यमंत्र्यांना साद

मुंबईच्या रस्त्यांवरील ७ हजार २११ खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेने केला आहे. तरीही खड्ड्यांच्या पाेटकळा मुंबईकरांना सहन कराव्या लागत आहेत. सर्वसाामन्यच नाही तर सेलिब्रेटिंनाही त्याच्या झळा सहन कराव्या लागत आहे. अगदी मराठी अभिनेता सुमीत राघवन हादेखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या हयातीत एकदा तरी संपूर्ण महाराष्ट्राचे रस्ते उत्कृष्ट प्रतीचे करण्याचे कष्ट ह्या सरकारने घ्यावेत आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे स्वप्न पूर्ण करावे अशी कळवळून विनंती करतो.” त्याने आपली व्यथा साेशल मिडियावर व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केलेली ही पाेस्ट सध्या साेशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

वास्तविक सुमीतनं एका नेटकऱ्याचे ट्वीट रिट्वीट केले आहे. ‘संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील रस्ते गुळगुळीत करण्याचा आणि वर्षभर एकही खड्डा न पडून देण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घ्यावा. या सरकारकडून जनतेला अपेक्षा आहे. दिलासा द्या. ’ असे हा नेटकरी या ट्वीटमध्ये म्हणत आहे.

नेटकऱ्याचे हे ट्वीट रिट्विट करत सुमीत म्हणाला, ‘अनुमोदन. सीएमओ महाराष्ट्र आमच्या हयातीत एकदा तरी संपूर्ण महाराष्ट्राचे रस्ते उत्कृष्ट प्रतीचे करण्याचे कष्ट ह्या सरकारने घ्यावेत आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे स्वप्न पूर्ण करावे, अशी कळवळून विनंती करतो.”

हे ही वाचा:

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५०० कोटींचा खर्च उद्धवजींनी स्वतःच्या खिशातून करावा!

मुख्यमंत्र्यांनी केली रतन टाटांची विचारपूस

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी

मनी लॉन्डरिंग कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च दिलासा; ईडीविरोधातील सुनावणी

“भीती” निर्माण होईल ड्रायव्हर्सच्या
मनात असं काहीतरी करा

केवळ खड्डेच नाही तर सुमीतनं या या आधी मुंबई पोलिसांवरही राग व्यक्त केला होता. या व्हिडीओत मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या बसचा ड्रायव्हर हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने बस चालवताना दिसतो. हा व्हिडीओ शेअर करत सुमीत म्हणाला, ‘कृपा करून “भीती” निर्माण होईल ड्रायव्हर्सच्या मनात असं काहीतरी करा. हे अती झालंय. तुमच्याबद्दल ह्यांच्या मनात आदर नाहीच आहे हे उघड आहे,भीती देखील नाही आहे. तर निदान भीती निर्माण करा कारण त्याशिवाय काही खरं नाही..’ यासोबतच सुमीतनं मुंबई पोलिसांनाही टॅग केलं आहे.

खड्डेमुक्त मुंबई करण्याचा संकल्प

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांची अवस्था दयनीय होते. थोडा पाऊस आला तरी रस्त्यांवर मोठाले खड्डे पडतात. पावसाळा तोंडावर आल्यावर डागडुजी केली जाते. मात्र, पुन्हा जैसे थे स्थिती तयार होत असल्याचं मुंबईकर पाहत आले आहेत. मात्र, आता खड्डेमुक्त मुंबई करण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (यांनी बोलून दाखवलाय. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्यावेळी गणपती उत्सवापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसंच खड्ड्यांवर कायमस्वरुपती तोडगा काढण्यासाठीही बैठकीत चर्चा झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा