हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी ११ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे . ५८ वर्षीय सखू हे हिमाचलचे १५ वे मुख्यमंत्री बनले आहेत. राजधानी शिमला येथील ऐतिहासिक रिज मैदानावर आयोजित कार्यक्रमात हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी सुखू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सखू यांनी दुपारी १.५० वाजता हिंदीतून शपथ घेतली. त्यांच्यानंतर अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनीही हिंदीतून शपथ घेतली. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाच्या सदस्यांचा शपथविधी झालेला नाही.
सुखविंदर सिंग सुखूचा शपथविधी सोहळा त्यांच्या आई संसारी देवी (८५) यांनी पाहिला, ज्यांना राहुल गांधींनी त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसवले. या सोहळ्याला काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पोहोचले. माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशिवाय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस नेत्यांनी सर्वप्रथम दिवंगत मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांना श्रद्धांजली वाहिली.
हे ही वाचा:
जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत खडसे पराभूत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका दिवसात ठरले ‘लोकप्रिय’
संकष्टी चतुर्थीला ११ ताऱ्यांचा उदय झाला
गेल्या ८ वर्षांत विचारसरणी आणि दृष्टिकोन बदललेत!
हमीरपूर जिल्ह्यातील नादौन उपविभागातील सेरी गावात २६ मार्च १९६४ रोजी जन्मलेले सुखविंदर सिंग सुखू यांना संघटना चालवण्याचा दीर्घ अनुभव आहे. २०१३ ते २०१९ अशी सहा वर्षे ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. याआधी ते १० वर्षे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. विद्यार्थी राजकारणात ते एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत.
सखू यांनी २००३ मध्ये पहिल्यांदाच नादौनमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. नादौनमधून ते चौथ्यांदा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. हमीरपूर जिल्ह्यातून मुख्यमंत्री होणारे सुखू हे दुसरे व्यक्ती आहेत. त्यांच्या आधी प्रेमकुमार धुमल हे हमीरपूरमधून मुख्यमंत्री झाले होते. हिमाचलमध्ये मुख्यमंत्रीपद भूषवणारे सुखू हे सातवे व्यक्ती आहेत. यापूर्वी डॉ.यशवंत सिंग परमार, ठाकूर रामलाल, शांता कुमार, वीरभद्र सिंग, प्रेमकुमार धुमाळ आणि जयराम ठाकूर यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली होती.