पंजाबमध्ये ‘पंजा’चा गोंधळ सुरूच! सुखजिंदर रंधावांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत

पंजाबमध्ये ‘पंजा’चा गोंधळ सुरूच! सुखजिंदर रंधावांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत

पंजाब मध्ये काँग्रेसने ओढवून घेतलेला राजकीय प्लीज काही संघटना संपत नाही पंजाबचा पुढचा मुख्यमंत्री हे अजूनही होताना दिसत नाहीये तर मुख्यमंत्र्यांच्या नावाची निवड काँग्रेससाठी अडचणीचा मुद्दा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. सुखजिंदर रंधावा यांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. अजून या विषयी कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा झाली नसली तरीही लवकरच रंधावा यांचे नाव जाहीर होणार असल्याचाही म्हटले आहे.

सुरुवातीला अंबिका सोनी यांच्याकडे काँग्रेस मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात असल्याचे म्हटले जात होते. पण सोनी यांनीच ही जबाबदारी स्विकारायला नकार दिल्याचे समजते. वय आणि प्रकृती यांचे कारण देत अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची माहिती मिळत आहे. तर पंजाबचा पुढचा मुख्यमंत्री शीख समाजाचा असावा असे मत सोनी यांनी व्यक्त केले आहे.

हे ही वाचा:

आयपीएलचा पुनःश्च हरी ओम

पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठी सोनीयांची सोनींना पसंती?

आज उघडणार मराठी बिग बॉसच्या घराचे दार

‘सावरकर: विस्मृतीचे पडसाद’ पुस्तकाचे बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते प्रकाशन

 

तर दुसरीकडे पायउतार झालेले मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी आपल्यात गटातील एका समर्थकालाच मुख्यमंत्री करण्यात यावे असे म्हटले आहे. अन्यथा पंजाब विधिमंडळात फ्लोवर टेस्ट घेतली जावी असा इशारा सिंग यांनी दिला आहे. काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची देखील मुख्यमंत्री म्हणून चर्चा होताना दिसत होती. पण सिद्धू यांना पंजाबचे मुख्यमंत्री केल्यास राज्यातील राजकीय पेचप्रसंग आणखीन वाढू शकतो असा अंदाज जाणकार वर्तवताना दिसत आहेत.

सध्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत रंधावा यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे समजते. काँग्रेसच्या सर्व आमदारांनी एकमताने रंधावा यांच्या नावाला पाठिंबा दिल्याची माहितीही समोर येत आहे.

Exit mobile version