राज्यसभेतील निवडणूक झाल्यानंतर आता त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार पराभूत झाले. त्यावरून वेगवेगळे आरोप केले जाऊ लागले आहेत. यात सुजय विखे यांनीही उडी घेतली असून शिवसेनेच्या उमेदवाराची भिस्त ही राष्ट्रवादीवर अवलंबून होती. जर राष्ट्रवादीचा उमेदवार असता तर तो नक्कीच निवडून आला असता. शिवसेनेचा उमेदवार होता, त्यामुळे त्यांनी हात काढून घेतला असे म्हणत सुजय विखे यांनी खिल्ली उडविली आहे.
सुजय विखे म्हणाले, जोपर्यंत राष्ट्रवादी पूर्णपणे थांबणार नाही तोपर्यं, शिवसेना वाचणार नाही. शिवाय, येत्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांची नाराजी दिसून येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सुजय विखे यांनी शिवसेनेला सल्लाही दिला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे व्यक्तिमत्त्व सोज्ज्वळ असले तरी ते चुकीच्या माणसांसोबत आहेत. अशीच शिवसेना राष्ट्रवादीसोबत राहिली तर पुढे धोका निश्चित आहे. आमदारांची संख्या २०-२५वर आल्यावाचून राहणार नाही.
हे ही वाचा:
“देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला जागा दाखवली”
‘राज्यसभा निवडणूक निकालानंतर अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय’
देवेंद्र फडणवीस यांची चौफेर घोडदौड
“संजय राऊत ब्रह्मदेव आहेत काय? मतदान दिलं नाही हे कसं कळालं?”
तिकडे रावसाहेब दानवे यांचे पुत्र व आमदार संतोष दानवे यांनी अब्दुल सत्तारांनीच आम्हाला मदत केल्याचे म्हटले आहे. राज्यसभा निवडणुकीत सत्तारांनीच आम्हाला मदत केली, असे संतोष दानवे म्हणाले. सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी संतोष दानवे यांना लक्ष्य करताना ते फुटून महाविकास आघाडीला मदत करतील, असे म्हटले होते. त्यावरून संतोष दानवे यांनी पलटवार केला आहे.