…नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती- सुजय विखे पाटील

…नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती- सुजय विखे पाटील

कोरोना संकटात इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी आयडिया लढवली. सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरुन रेमडिसिव्हर इंजेक्शनचा मोठा कोटा आणला. सुजय विखे यांनी खाजगी विमान करुन रेमडिसिव्हर इंजेक्शन अहमदनगरला आणली. तब्बल दहा हजार इंजेक्शन्स त्यांनी नगरकरांसाठी आणली.

दोन दिवसापूर्वी सुजय विखे यांनी ही इंजेक्शन्स आणली आहेत. त्यानंतर त्यांनी आज सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन याबाबतची माहिती दिली. “ही इंजेक्शन्स सर्व पक्षातील लोकांसाठी आहेत. कोणी याचे राजकारण करू नये, मी मुद्दाम दोन दिवस लेट हा व्हिडीओ अपलोड केला. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती” असं सुजय विखे पाटील म्हणाले.

माझ्यापरीने जमेल ती मदत अहमदनगर जिल्ह्याला करण्याचा प्रयत्न मी करत आहे. तरुण मुलं आज तडफडत आहेत. त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नका. ज्यांनी मला खासदार केलं, निवडून दिलं, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने जमेल ती मदत करत आहे, असं सुजय विखे म्हणाले. हा पैसा कमावण्याचा धंदा नाही. लोकप्रतिनिधी म्हणून हे करणं आमची जबाबदारी आहे आणि त्याचं मला समाधान आहे. लोकांना माझ्या डोळ्यासमोर मरताना मी पाहू शकत नाही, असं सुजय विखे म्हणाले.

हे ही वाचा:

खरा सूत्रधार मंत्रालय सहावा मजला की सिल्वर ओक?

बंगळुरूमध्ये पुण्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह केसेस

पॅरिसमध्ये इस्लामी दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला

विरार दुर्घटनेत हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल

मी गेलो फॅक्टरीत, तिथे मी माझ्या मैत्री संबंधांचा वापर केला, मदत घेतली आणि ही औषधं घेतली. माझ्यावर कारवाई होईल की नाही माहिती नाही. खासगी विमानाने ही औषधं आणतोय. माझ्या मनात पाप नाही, त्यामुळे मी कारवाईला घाबरत नाही, असं सुजय विखेंनी सांगितलं.

Exit mobile version