कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिच्या मृत्यूची खळबळजनक बातमी समोर आली आहे. डॉ.सौंदर्या त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आली आहे. सौंदर्या (३०) ही बेंगळुरूच्या एमएस रमैया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होती. सौंदर्याने बेंगळुरू येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या बोअरिंग अँड लेडी कर्झन हॉस्पिटलमध्ये तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
सौंदर्या ही तिच्या पती डॉ.नीरज आणि सहा महिन्यांच्या बाळासोबत शहरातील माउंट कार्मेल कॉलेजजवळील एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. दोन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते.
पोलिसांच्या माहितनुसार, आज सकाळी घरातील नोकराने खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर नोकराने डॉ. नीरज यांना फोन केला. त्यावेळी नीरज यांनी सौंदर्या यांना फोन केला. मात्र, फोन उचललाच नाही. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी सौंदर्या यांचा मृतदेह बेडरूममधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र अद्याप मृत्युचे खरे कारण समोर आलेले नाही. बंगळुरूच्या हाय ग्राउंड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ दणका…भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द
महाभकास आघाडी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीचे थोबाड फोडणारा निर्णय
मैदानाला अनधिकृतरीत्या टिपूचे नाव देणाऱ्या सेनेला महात्मा गांधींच्या नावाचा विसर
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे ठाकरे सरकारला थप्पड
सौंदर्या ही येडियुरप्पा यांची पहिली मुलगी पद्मा यांची मुलगी होती. तिच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या कुटुंबीय धक्का बसला आहे. भाजपचे दिग्गज नेते येडियुरप्पा यांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह रुग्णालयात पोहोचले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसते.
बीएस येडियुरप्पा यांनी कर्नाटकाचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. शिकरिपुरा या मतदारसंघातून ते कर्नाटक विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहतात. आतापर्यंत चार वेळा कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.