पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील राजकारणाला आता रंगत आली आहे. नाशिकमध्ये काँग्रेसने उमेदवारी दिलेले सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर त्यांचे निलंबन काँग्रेसमधून करण्यात आले आहे. त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे पत्र काँग्रेसने जारी केले आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने ही कारवाई केली आहे.
सुधीर तांबे यांना काँग्रेसने या मतदारसंघासाठी उमेदवारी दिली होती पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी मात्र तांबे यांनी माघार घेतली आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यातून मग या वादाला सुरुवात झाली. ज्या सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली त्यांनी उमेदवारी अर्जच भरला नाही. शिवाय, त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरून भाजपाकडून पाठिंबा मागितला. त्यामुळे काँग्रेसची चांगलीच गोची झाली. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सत्यजीत तांबे यांचे मामा. त्यामुळे काँग्रेसची अधिकच नाचक्की झाली. थोरात यांनी भाजपाशी बोलून तांबे यांना तिकीट न देण्याची विनंती केल्याचेही कळते. मात्र तरीही सत्यजीत तांबे यांनी भाजपाकडून पाठिंबा मागितला आहे. भाजपाने मात्र नाशिकमधून आपला उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकारात काँग्रेसला धोबीपछाड दिल्याची भावना आहे.ॉ
हे ही वाचा:
प्रत्येक भारतीयाला आपल्या लष्कराचा अभिमान
पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक मोदींच्या प्रेमात; भारताच्या मुत्सद्देगिरीचे कौतुक
कुस्तीपटुंना खुशखबर.. मानधनात होणार इतकी वाढ
बनावट चलनाचे कारस्थान अर्थमंत्रालयातच शिजले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी यापूर्वीत सत्यजीत तांबे यांच्याबाबत खबरदार केले होते. मात्र काँग्रेसने अजित पवारांकडे दुर्लक्ष केले आणि आता घात झाल्याचे स्पष्ट झाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या सगळ्या घडामोडीनंतर नाराजी व्यक्त केली होती, पण आता हातून सगळी संधी निसटून गेली आहे.