ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. संजय राऊत म्हणाले की, मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. त्यांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडली का अशा चर्चांना उधाण आले आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावरून महाविकास आघाडीसह ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “हे होणारचं होते. काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात कुठेही ताळमेळ नाही. काँग्रेससोबत जायची वेळ आली तर शिवसेनेचं दुकान बंद करेल असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपशब्द काढणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना बाळासाहेबांनी जोड्याने मारण्याची भाषा केली होती. त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेस ही तात्पुरती युती होती. खुर्चीसाठीची ती युती होती. आता काँग्रेसचा खरा चेहरा ठाकरेंच्या लक्षात आला आहे. काँग्रेसचा खरा चेहरा हा परिवारवादी आणि घराणेशाहीचा आहे. देशापेक्षा खुर्ची मोठी मानणारा असा हा चेहरा आहे. त्यामुळे हे एक दिवस होणारच होतं,” अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, “शेवटी पक्ष कितीही मोठा असला तरी कार्यकर्ते पक्ष मोठा करत असतात. पण पक्ष आणि पक्षाचे नेते अहंकारात जातात; कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना हीन समजतात तेव्हा पक्ष रसाताळाला जातो. मुंगी सुद्धा हत्तीला जागा दाखवते, हे समजलं पाहिजे. महाविकास आघाडीत हे कधी ना कधी होणारचं होतं. पण ते लवकर झालं,” अशी खोचक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
हे ही वाचा :
‘AI ऍक्शन’साठी पंतप्रधान मोदी जाणार फ्रान्सला
काय होईल ते होईल, आम्ही सगळ्या पालिका निवडणुका स्वबळावर लढू!
हिंदू आध्यात्मिक मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी अमृतमयी गो भारती संमेलन, वनवासी कल्याण आश्रमचे कार्यक्रम
रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची वर्षपूर्ती; याचं दिवशी करोडो हिंदूंची झाली होती स्वप्नपूर्ती!
“काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनीच ‘इंडी’ आघाडी विसर्जित झाल्याचं सांगितलं. इंडी आघाडी लोकसभेपुरती होती, आता संपलं, असं खेडा पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यामुळे ठाकरे गटाने महाविकास आघाडी सोडली असं म्हणता येत नाही. महाविकास आघाडी ‘इंडी’ आघाडीचा भाग होती. एक कंपनी बुडाल्यावर त्याची भागिदार कंपनी बुडणारचं,” असा खोचक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.