महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपकडून त्यांच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर सातत्याने टीका होत असते. यातच आता भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री हे जगातील आठवे आश्चर्य असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
आमदार म्हणून निवडून आलेले सुनील राणे यांच्या द्वितीय कार्य अहवालाचे प्रकाशन भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले होते. तेव्हाच त्यांनी आगामी निवडणुकीत मुंबईत भाजपचा महापौर बसेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
मला चुकीच्या पद्धतीने अडकवले जात आहे, वानखेडे यांनी लिहिले पत्र
… म्हणून त्याने मारली राज्यपालांच्या कानशिलात!
नाशिकमधील शिवसैनिकांना पडला उद्धव ठाकरेंचा विसर!
कुणाल जानी कलानगरमधील मंत्र्याच्या जवळचा
स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्याला दोष देण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. राजकारणामध्ये सर्वात गलिच्छ कार्यक्रम सुरू आहे. स्वतःचे केलेले पाप झाकण्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवायचे हर्बल वनस्पती गांजाचे नवीन नाव मी ऐकत आहे. जनतेचा विश्वासघात करत हे सरकार स्थापन झालेले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत कर्णधार यांनी एकही दिवस मंत्रालयात न जाण्याचा रेकोर्ड ब्रेक केला आहे. याचीही नोंद केली पाहिजे. सात अजुबे इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हे, असे वक्तव्य करत सुधीर मुंनगंटीवार यांनी मुख्यमंत्री आणि सरकारवर निशाणा साधला आहे.