28 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरराजकारण“कुंभकर्ण म्हणेल, मी सहा महिने झोपायचो काँग्रेसवाले वर्षभर झोपतात”

“कुंभकर्ण म्हणेल, मी सहा महिने झोपायचो काँग्रेसवाले वर्षभर झोपतात”

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवारांचा काँग्रेसला खोचक टोला

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. अशातच भाजपाने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या मोहिमेला चंद्रपूरपासून सुरुवात केली आहे. भाजपाचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दिग्गजांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. यावेळी भाजापा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आदी उपस्थित होते.

भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिलेला आहे. अशातच चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार हे भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुनगंटीवार यांच्यासाठी महायुतीची विजय संकल्प सभा पार पडली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसला कुंभकर्णाची उपमा देत जोरदार टोलाही त्यांनी लगावला.

सुधीर मुनगंटीवार बोलताना म्हणाले की, “घाई घाईमध्ये मी मंचावर आलो आहे, जर कोणाचं नाव घ्यायला विसरलो असेल, तर पाय आपटू नका. कारण तुम्ही पाय आपटले, तर निवडणुकीत आपटायची वेळ येईल. मी देवाचा आशीर्वाद घेऊन आलो आहे. मात्र, ज्यांच्या नावामध्येच देव आहे, ते देवेंद्र फडणवीस आशीर्वाद द्यायला आले असतील, तर जगात कोणीही पराभूत करू शकत नाही. महायुतीचे सर्व घटक आणि कार्यकर्ते कृत्रिमपणे नाही, तर मनापासून कामाला लागले आहेत म्हणून वाटतं आहे की निवडणूक माझी नाही तर तुमची आहे. म्हणूनच ठरवलं आहे, जिंकलो तर माजायचं नाही, हरलो तर खचायचं नाही,” असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

“तुम्ही डोळ्यातील अश्रू पाहून, वैयक्तिक सहानुभूतीवर मतदान कराल, तर पुढील पाच वर्ष तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतःच करावी लागेल,” असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस उमदेवार प्रतिभा धानोरकर यांच्यावर टीकास्त्र डागले.

हे ही वाचा:

अमेरिकेत जहाज धडकून ब्रिज कोसळला

‘जय श्री राम’ बोलला म्हणून मीरा रोडमध्ये अल्पवयीन मुलाला केली मारहाण

पंजाबमध्ये अकाली नको; भाजपा ‘अकेला’ करणार वाटचाल

पुतिन म्हणतात, मॉस्को हल्ल्यामागे ‘कट्टरपंथी इस्लामवादी’

“माझी लढाई काँग्रेसच्या उमेदवारासोबत नाही. मी विकासाबद्दल बोलणार, समोरच्या उमेदवारांनी त्यांचे सरकार असताना किती काम केले, किती दिवे लावले हे सांगायला हवे. सत्तेत असताना किती झोपा काढल्या हे सांगायला पाहिजे. काँग्रेस कुंभकर्णापेक्षा पुढे आहे. कुंभकर्ण म्हणेल काँग्रेसवाले तर माझेही बाप आहेत. मी सहा महिने झोपायचो हे वर्षभर झोपतात,” अशी जहरी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा