क्रूझ पार्टीतील ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली. त्याला वाचवण्यासाठी शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. आर्यन खान प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी तिवारी यांनी याचिकेद्वारे केली आहे. त्यावर भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली आहे. ड्रग्स सारख्या संवेदनशील विषयावर आर्यन खानची पाठराखण करणे ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
अभिनेता शाहरुख खान आणि त्याचे वकील या प्रकरणात आर्यन खानची बाजू मांडतील. ड्रग्स सारख्या संवेदनशील विषयावर आर्यन खानची पाठराखण करणे ही लाजिरवाणी बाब आहे. तसेच याचिकाकर्त्यांना आर्यन खान निर्दोष असल्याचे कुणी सांगितले? त्यांना सहावे इंद्रिय आहे का? असा संतप्त सवाल मुनगंटीवार यांनी विचारला आहे.
हे ही वाचा:
बापरे! डॉक्टरांनी ‘किडनी स्टोन’ ऐवजी ‘किडनी’च काढली
एलएसीवरील सैनिक शिकणार ‘तिबेटोलॉजि’
देवभूमीत पुन्हा ढगफुटीने हाहाःकार
‘शिवतीर्थावरील इटलीचे दिवे हा योगायोग, की लांगुलचालन?’
त्याचबरोबर इंधर दरवाढ आणि महागाईवरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून करण्यात आलेल्या टीकेलाही मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे. राज्यातील स्थितीकडे दुर्लक्ष करुन केंद्रावर आरोप करण्याची ‘सामना’ची सवय आहे. केंद्राने पेट्रोल- डीझेल जीएसटी अंतर्गत आणावे असा प्रस्ताव दिल्यावर रुसणारा अर्थमंत्री महाराष्ट्राच होता, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून एनसीबी मुंबई आणि बॉलीवूडला बदनाम करत आहे, पदाचा गैरवापर करत आहे, तपासाबाबत एनसीबीची चौकशी झाली पाहिजे, असे मुद्दे त्यांनी याचिकेत मांडले आहेत.